पूजा दादवालला लहानपणापासूनच सिनेमाची आवड होती आणि ती मोठी झाल्यावर तिला हिरोईन व्हायचं होतं. त्यामुळे शालेय अभ्यासासोबतच तिने अभिनयाचे धडेही घ्यायला सुरुवात केली. अॅक्टिंग क्लास दरम्यान या अभिनेत्रीला चित्रपटाची ऑफर मिळाली. वयाच्या 17 व्या वर्षी पूजाने सलमान खानसोबत 'वीरगती' (1995) या अॅक्शन फिल्ममधून डेब्यू केला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला.
advertisement
शाहरुख की सलमान कोणाकडे आहे जास्त बँक बॅलन्स? अजय देवगणने स्पष्टच सांगून टाकलं
'वीरगती' नंतर पूजाने आणखी काही चित्रपट केले, पण तिला स्वत:ची ओळख मिळवता आली नाही. सलमानसोबतच्या 'वीरगती', रवी किशन स्टारर 'सिंदूर की सौगंध' आणि 'इंतकाम' या चित्रपटांशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली. त्यानंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली. पूजाच्या नशिबानं साथ सोडली आणि तिच्यावर मोठं संकट कोसळलं.
एकेकाळी चित्रपटात हिरोईन होऊन आरामात आयुष्य जगण्याची स्वप्न पाहणाऱ्या पूजावर आज दुसऱ्याच्या घरात काम करायची वेळ आली आहे. पूजा आता मुंबईतील एका कुटुंबासाठी घरकाम करत आपला उदरनिर्वाह करत आहे. पूजा डडवालला बॉलिवूडमध्ये चांगल्या ऑफर्स न मिळाल्याने तिने टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण तिथेही तिला अपयशच आलं त्यानंतर तिने करिअर सोडून संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
पूजाचे लग्न झाले आणि ती पतीसोबत गोव्याला शिफ्ट झाली. पूजाने गोव्यात तिच्या पतीचा कॅसिनोही सांभाळला पण 2018 मध्ये पूजा आजारी पडली. तिला टीबी या गंभीर आजाराने ग्रासलं. पूजाच्या प्रकृतीची माहिती सासरच्यांना मिळताच तिच्या पतीनं तिच्यासोबतचं नातं तोडलं आणि तिला मुंबईत एकटं सोडलं.
रणबीरसोबत दिली 800 कोटींची फिल्म आता अभिनेत्री करतेय चक्क शेतात काम; 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास
ना तब्येत, ना पैसा, ना काम, ना कुटुंब अभिनेत्री आपलं एकाकी आयुष्य जगत होती. तेव्हा अभिनेत्रीला राजेंद्र सिंह यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी तिला सरकारी रुग्णालयात उपचार मिळवून दिले. अतिशय सुंदर दिसणारी ही अभिनेत्री आता आरोग्याच्या समस्येमुळं पार खंगून गेली आहे. याच काळात अभिनेत्रीनं मदतीसाठी आवाहन केलं. या अभिनेत्रीनं यूट्यूबवर एका व्हिडिओ मेसेजद्वारे सलमानकडे आर्थिक मदत मागितली होती. सलमानने लगेचच मदतीचा हात पुढे केला आणि पुढील सहा महिन्यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.
पूजा थोडी बरी झाल्यावर ती मुंबईतील एका चाळीत आली आणि कुटुंबासोबत राहू लागली. पूजाने 2020 मध्ये 'शुक्राना: गुरु नानक देव जी' या पंजाबी चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण तिचा हा चित्रपटही फ्लॉप ठरला आणि पूजा पुन्हा एकदा अज्ञाताच्या गर्तेत हरवून गेली.
पूजा दादवालने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा मित्र आणि दिग्दर्शक राजेंद्र सिंहने तिला उदरनिर्वाहासाठी टिफिनचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. या कामासाठी त्यांनी अभिनेत्रीला जागा आणि इतर साधनेही उपलब्ध करून दिली. पूजा अजूनही एका चाळीत राहते आणि तिथून टिफिन सेवा चालवते. तसचं मुंबईत एका कुटुंबासोबत राहते, जिथे ती त्या कुटुंबाचं घरकाम करते.