Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुले घराघरांत पोहोचला आहे. सुमारिया चौघुलिया, चोलन मजनू अशी ओळख हास्यजत्रेने समीर चौघुलेला मिळवून दिली. नुकतचं सोनी मराठीच्या 'MHJ Unplugged' या कार्यक्रमात समीर चौघुले यांनी आपल्या आयुष्याबद्दलचे अनेक किस्से शेअर केले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम त्यांच्यासाठी खूप खास असल्याचं ते म्हणाले आहेत.
advertisement
समीर चौघुले म्हणाले,"महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. हास्यजत्रा नसतं तर आज समीर चौघुले वेगळ्या ठिकाणी असता. हास्यजत्रामुळे समीर चौघुलेला एक स्वत:चं अस्तित्व निर्माण करता आलं आहे. गेले 15 वर्ष मी हा फॉर्म करतोय. हास्यजत्रेने लोकांच्या घरातलं एक सदस्य बनवलं आहे. लोकांच्या जवळ जाणं, वयस्कर आजीने डोक्यावर हात फिरवून गुळाची पोळी देणं, अशा गोष्टी होतात. तेव्हा हास्यजत्रेने काय दिलंय याची प्रचिती येते. हास्यजत्रेने मला काय दिलंय हे मी शब्दात मांडू शकत नाही".
इक्बालशी लग्न अन् धर्मावरून प्रश्नांचा भडीमार, सोनाक्षी सिन्हाने एका वाक्यातच केलं सगळ्यांना 'खामोश'
'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' हा कार्यक्रम जगभर पाहिला जातो. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मंडळींपर्यंत सर्वच वयोगटातील मंडळी हास्यजत्रा आवडीने पाहतात. महराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टाईमलाईनमध्येही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आहे. सचिन तेडुंलकर, सुनिल गावस्करसह अनेक दिग्गज क्रिकेटर मंडळींही हा कार्यक्रम पाहतात.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना उत्तम संधी दिली आहे. आपल्या विनोदाच्या जोरावर ते प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. हास्यजत्रेमुळे काही विनोदवीरांना स्वत:ची ओळख दिली, कोणाचं स्वत:चं घर झालंय तर कोणी पहिल्यांदाच परदेशी गेलंय. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.