दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या नावाने आयोजित केलेल्या या दहीहंडीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. लाखो गोविंदा आणि प्रेक्षकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. अशा उत्साही वातावरणात संतोष जुवेकर मंचावर दाखल होताच, उपस्थितांमध्ये आनंदाची लाट पसरली.
advertisement
अभिनेता संतोष जुवेकर याने यावेळी बोलताना गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या साहसाचे कौतुक केले. 'प्रत्येक वर्षी या दहीहंडी उत्सवाची भव्यता वाढत आहे. दिघे साहेबांच्या नावाने हा उत्सव आयोजित केला जातो, त्यामुळे त्याला एक वेगळे महत्त्व आहे,'
माध्यमांशी बोलताना संतोष जुवेकर म्हणाला, टेंभी नाका माझंच होम ग्राऊंड आहे, माझंच घर आहे. ठाण्यातील पहिला मानाची दहिहंडी आहे ही. या दहीहंडीशी एक वेगळं नातं आहे. दरवर्षी येतो, हा आनंद जल्लोष बघतो, खूप बरं वाटतं. लहान असताना दिघे साहेबांबरोबर आनंद मठीत मुलांसाठी कार्यक्रम असायचे तेव्हा आम्ही कार्यकर्तेही काम करायचे. ठाणे प्रकल्भ, समृद्ध होतंय याचा मला आनंद आहे."
दरम्यान, ठाण्याच्या दिघे साहेबांच्या दहीहंडीत अभिनेता संतोष जुवेकरने खास डायलॉगही बोलला. मोरया चित्रपटातील डायलॉग मारत अभिनेता संतोष जुवेकरने गोविंदाचा जोश वाढवला.