TRENDING:

तेरे जैसा यार कहाँ! जेव्हा सयाजी शिंदेंना 50 वर्षांनंतर भेटतो त्यांचा जुना मित्र... VIDEO

Last Updated:

Sayaji Shinde Meet School Friend : सयाजी शिंदे यांचा ५० वर्षांपूर्वीच्या शालेय मित्राशी फोनवर संवाद आणि भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या साधेपणाने आणि जुन्या नात्यांवरील प्रेमाने चाहत्यांना भारावून टाकलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या 50 वर्षांपूर्वीच्या शालेय मित्राशी फोनवर बोलताना आणि त्याची भेट घेताना दिसत आहेत. सेलिब्रिटी झाल्यानंतर अनेकजण जुन्या नात्यांना विसरतात, पण सयाजी यांनी मात्र आपल्या मित्राशी जुळलेलं नातं अजूनही तसंच ठेवलेलं आहे.
News18
News18
advertisement

50 वर्षांपूर्वीच्या मित्राशी फोनवर संवाद

या व्हायरल व्हिडीओमध्ये सयाजी शिंदे आपल्या सातवीतील मित्राशी बोलताना दिसतात. त्यांना कोलकात्यात पंजाबी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचं असून, ते आपल्या मित्राला देखील सोबत येण्याचा आग्रह करत आहेत. ते म्हणतात, "मला कलकत्त्याला शूटिंगला जायचंय, एका पंजाबी फिल्मसाठी. आज दुपारी पुण्यावरून निघायचं आहे. तिकडे येतोस का? तीन दिवस राहायचंय. मग सुनेला सांग, माझ्या मोबाईलवर आधारकार्ड पाठवायला आणि तू येणार का नाही, ते मला अर्ध्या तासात सांग." या साध्या संवादातूनही सयाजी शिंदे यांची मैत्री आणि दिलदारपणा सहज लक्षात येतो.

advertisement

( थिएटरसाठी मुंबईत आले, हिंदी, साऊथमध्ये रुळले; 22 वर्षांनी सयाजी शिंदेंचं मराठी नाटकात कमबॅक )

50 वर्षांनंतर भेट – जुन्या आठवणींना उजाळा

व्हिडीओच्या पुढच्या भागात सयाजी आणि त्यांचा मित्र प्रत्यक्ष भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा देताना सयाजी म्हणतात, "सातवीतला मित्र आता भेटतोय. जवळपास 50 वर्ष झाली. काय करतोस आता? आम्ही आता विमानाने चाललोय पहिल्यांदा! त्यांचा हा संवाद ऐकून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत आणि त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.

advertisement

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सयाजी शिंदेंच्या या साधेपणाने आणि जुन्या मित्रांविषयी असलेल्या प्रेमाने चाहत्यांना भारावून टाकलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "माणसातला देवमाणूस!" दुसऱ्यानं लिहिलंय, "आजकाल मुलगा मोठा अधिकारी झाला तरी बापाला विचारत नाही, पण हा माणूस 50 वर्ष जुने मित्र जपतो." आणखी एकाने लिहिलंय, "लोक सेलिब्रिटी झाल्यावर जुन्या मित्रांना विसरतात, पण सयाजी सर स्वतः फोन करून त्याला भेटायला बोलावतात, हेच त्यांची खरी मोठेपणाची ओळख आहे."एकाने लिहिलंय, "खरा कलाकार तोच, जो श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता नातं टिकवतो."

advertisement

सयाजी शिंदे – जमिनीशी जोडलेला कलाकार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रँडला ठार मारण्याआधी चाफेकर बंधूंनी इथं घेतली होती शपथ, ब्रिटिशांनी हीच 'ती' मूर्ती केली जप्त, Video
सर्व पहा

सयाजी शिंदे हे केवळ उत्कृष्ट अभिनेतेच नाही, तर एक दिलदार आणि जमिनीशी जोडलेला माणूस आहेत. त्यांनी आपल्या मित्रांसोबत असलेलं नातं 50 वर्षांनंतरही तसंच जपलं आहे, हे पाहून प्रेक्षक भारावले आहेत. त्यांचा हा दिलदारपणा खरंच प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
तेरे जैसा यार कहाँ! जेव्हा सयाजी शिंदेंना 50 वर्षांनंतर भेटतो त्यांचा जुना मित्र... VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल