40 वर्षांनी 'पुरूष' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं. अभिनेते शरद पोंक्षे, अविनाश नारकर, स्पृहा जोशी, नेहा परांजपे, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
( Sharad Ponkshe: 'लोक माझ्या मरणाची वाट पाहत आहेत' शरद पोंक्षेंचा धक्कादायक खुलासा )
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात 'पुरूष' या नाटकाचा प्रयोग सुरू होता. संपूर्ण नाट्यगृह प्रेक्षकांनी भरलं होतं. नाटक सुरू झालं. नाटक सुरू असताना शरद पोंक्षे शांत झाले. त्यांना काहीच आठवेनासं झालं. मंचावर ते सगळे डायलॉग विसरले. त्यांनी प्रेक्षकांकडे थोडा वेळ मागितला. ते म्हणाले, ''रसिकहो... मी पुरता ब्लॅंक झालोय. मला काहीच आठवत नाहीये. मला जरा वेळ द्याल का?'' यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना संमती दिली.
advertisement
शरद पोंक्षे यांनी थोडा वेळ घेतला पण तरीही त्यांना काही आठवेना त्यामुळे त्यांनी नाटक थांबवलं आणि प्रयोग रद्द केला. पण प्रेक्षकांच्या विनंतीला मन देत ते पुन्हा रंगमंचावर आले. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांना गहिवरून आलं. त्यांच्या या संपूर्ण परिस्थितीत उपस्थित कलाकार त्यांच्याबरोबर त्यांना धीर देतच होते. पण त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे देखील तिथे उपस्थित होता. शरद पोंक्षेंच्या बाजूला उभा राहून तोही त्यांना धीर देताना दिसला. नाटकाचा प्रयोग रद्द झाला पडदा पडला तेव्हा शरद पोंक्षे लेकाला मिठी मारून रडताना दिसले. बाप आणि लेकाचा हा भावुक क्षण पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं.
नेमकं काय झालं?
नाटक सुरू होतं. पहिला अंक उत्तम झाला. दुसऱ्या अंकातील महत्त्वाचा सीन सुरू झाला आणि शरद पोंक्षे अचानक थांबले आणि त्यांनी प्रेक्षकांमध्ये पाहिलं. कोणाचा तरी फोन वाजतोय किंवा कोणी फोटो काढतंय म्हणून ते थांबले असं सर्वांना वाटलं. पण तेवढ्यात शरद पोंक्षे म्हणाले, ''रसिक प्रेक्षकांनो, मी ब्लॅंक झालोय, मला काहीही आठवत नाहीये. 2 मिनिटं थांबू का?'' त्यावर प्रेक्षकांनी कोणताही संकोच न करता प्रेक्षक म्हणाले, ''आम्ही तुमचे फॅन आहोत, तुम्ही वेळ घ्या.'' मग सगळे लाइट्स बंद केले आणि ते विंगेत गेले. 10-15 मिनिटांनी नाटकाचे दिग्दर्शक मंचावर आले आणि त्यांनी पोंक्षे यांना बरं वाटत नसल्याने ते थोडी विश्रांती घेत आहेत. त्यांना बरं वाटेल तेव्हा आम्ही आता मध्यंतर घेतोय असं सांगितलं. अर्धा-पाऊण तासाने स्टेजवर लाइट्स आल्यावर प्रेक्षक खुर्चीवर येऊन बसले. 2 मिनिटांनी शरद पोंक्षे मंचावर आले आणि ते म्हणाले, ''40 वर्षात असं पहिल्यांदा होतंय. मी तुमची माफी मागतो. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.'' पण मायबाप प्रेक्षकांचं प्रेम इतकं मोठं आहे की त्यांनी शरद पोंक्षे यांना सांगितलं, ''आम्ही पुन्हा तुमचं नाटक पाहायला येऊ.''
