सिलिकॉन इम्प्लांट्सचा फोटो शेअर केला. याचं वजन 825 ग्रॅम होते. फोटो शेअर करत शर्लिनने लिहिलं आहे,"सिलिकॉन-फ्री! आता खूप हलकं वाटतंय". एका व्हिडिओमध्ये शर्मिलीनं इम्प्लांट्स हातात घेऊन लोकांना सांगितलं आहे की, अशी चूक पुन्हा कोणी करू नये".
शर्लिनने शस्त्रक्रियेसाठी आपल्या डॉक्टर्सच्या टीमचे आभार मानले. व्हिडिओमध्ये इम्प्लांट्स हातात घेत शर्लिनने लोकांना सावध करत सांगितलं की तिनं केलेली चूक कोणीही करू नये. तिनं हे किती वेदनादायक ठरू शकतं, हेही स्पष्ट केलं. कॅप्शनमध्ये शर्लिनने लिहिलं आहे,"माझा ठाम विश्वास आहे की अनावश्यक ओझं घेऊन जगण्यात काही अर्थ नाही. ही माझी वैयक्तिक मते आहेत… प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. माझ्या ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरीसाठी माझ्या हुशार डॉक्टर्सच्या टीमचे मनःपूर्वक आभार.”
advertisement
शर्लिन चोप्रा काढून टाकणार हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट, हॉस्पिटलमधून शेअर केला VIDEO, सांगितलं भयंकर कारण
शर्लिनला होता भयंकर त्रास
शर्लिनने उघड केलं की तिला अनेक महिन्यांपासून पाठ, छाती, मान आणि खांदेदुखीचा त्रास होत आहे. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर समजलं की तिच्या लक्षणांचे कारण हेच इम्प्लांट्स होते. छातीवर सततचा दबाव आणि स्नायूंवरील ताण यामुळे तिचं आयुष्य कठीण झालं होतं. शर्लिनने याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिला होणाऱ्या त्रासाबाबत चाहत्यांना सांगितलं होतं. तसेच यावेळीच तिने हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकणार असल्याचंही बोलली होती. शर्लिनला चाहते आता आराम करण्याचा सल्ला देत आहे. तसेच तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
इम्प्लांट्सबाबत डॉक्टरांचा काय आहे सल्ला?
स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. ईशा नंदल यांच्या मते, ब्रेस्ट इम्प्लांट्समुळे छातीवर अतिरिक्त भार पडतो. ज्यामुळे वरच्या शरीरातील स्नायूंवर ताण येतो आणि झोपेच्या तक्रारीही होऊ शकतात. शस्त्रक्रियेनंतर शर्लिन आता आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहे. तसेच लेटेस्ट फोटोमध्ये अभिनेत्री आनंदी दिसत आहे.
