शिल्पाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत बास्टियनला निरोप दिला. तिने लिहिलं, “या गुरुवारी एका युगाचा अंत होत आहे. बास्टियन वांद्रे आपल्याला निरोप देत आहे. या ठिकाणी असंख्य आठवणी आहेत, मुंबईच्या नाईटलाइफला परिभाषित करणाऱ्या रात्री आहेत. आता हे सगळं फक्त आठवणीत राहील.”
मृणाल ठाकूर सुधारली नाही, बिपाशानंतर अनुष्का शर्मावर साधला निशाणा? म्हणाली, 'ती काम करत नाही..'
advertisement
तिने पुढे सांगितलं की, बास्टियनचा वारसा मात्र ‘बास्टियन अॅट द टॉप’मधून पुढे चालू राहील. 2016 मध्ये सुरू झालेलं बास्टियन वांद्रे हे शिल्पा आणि व्यावसायिक रणजीत बिंद्रा यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. मुंबईकरांसाठी हे ठिकाण पार्टी, सीफूड आणि ग्लॅमर यासाठी ओळखलं जात होतं. बॉलिवूडपासून ते उद्योगजगतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी इथे भेट दिली होती. त्यामुळे हे रेस्टॉरंट बंद होणं चाहत्यांसाठी मोठं धक्का देणारं आहे.
मात्र, याचवेळी शिल्पा-राज यांच्या विरोधात मोठं प्रकरण उभं राहिलं आहे. व्यापारी दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल करून या दाम्पत्यावर 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. कोठारींचं म्हणणं आहे की, त्यांनी 2015 ते 2023 दरम्यान ‘बेस्ट डील टीव्ही प्रा. लि.’ या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र ही रक्कम व्यवसायात न वापरता वैयक्तिक खर्चासाठी वळवली गेली.
shilpa shetty
या आरोपांवर शिल्पा आणि राज यांचे वकील प्रशांत पाटील यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचं आहे. कंपनी आधीच आर्थिक संकटात सापडली होती आणि एनसीएलटीकडून लिक्विडेशनचा आदेशही मिळाला होता. “आम्ही वेळोवेळी पोलिसांना सर्व कागदपत्रं दिली आहेत. हा खटला निराधार असून, क्लायंटची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेला कट आहे,” असं पाटील यांनी स्पष्ट केलं.