श्रद्धाने सांगितलं की, मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये आता एक नवा सदस्य येत आहे, छोटी स्त्री. हा अॅनिमेटेड चित्रपट मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि तरुणांसाठी एक धमाका ठरणार आहे. "हा माझा आवडता प्रोजेक्ट आहे. दिनेशने हे सांगितलं तेव्हा मला वाटलं की त्याचं खरं नाव ‘दिनेश व्हिजन’ असावं. कारण त्याच्या कल्पनाशक्तीला तोडच नाही," असं श्रद्धाने हसत हसत सांगितलं.
advertisement
15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
छोटी स्त्रीबद्दल दिनेश म्हणाले, "हा चित्रपट स्त्रीच्या कथा-जगाचा उगम दाखवेल. त्याचा शेवट थेट स्त्री 3शी जोडला जाईल. म्हणजेच प्रेक्षकांना अॅनिमेशनमधून लाईव्ह-ऍक्शन चित्रपटात जाण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे. छोटी स्त्री स्त्री 3च्या सहा महिने आधी रिलीज होईल."
या कार्यक्रमात मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा लोगोही सादर करण्यात आला. श्रद्धा कपूरने यावेळी हेही स्पष्ट केले की या युनिव्हर्समध्ये अजून अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत या मालिकेबद्दल आणखी उत्सुकता वाढली आहे.