TRENDING:

Solapur Flood: कर्ज काढून बांधलेला निवाराही पुराने गिळला, आता जगायचं कसं? सोलापुरातील महिलेने फोडला टाहो

Last Updated:

Solapur Flood: जीव वाचवण्यासाठी निर्मला बनसोडेंच्या कुटुंबातील 11 जणांनी रात्री 2 वाजता घर सोडलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. जालना, बीड, धाराशीव आणि सोलापूर जिल्ह्यांना तर अतिवृष्टीचा तडाखा बसला. सोलापुरातील अनेक तालुक्यांना सीना नदीच्या महापुराचा वेढा बसला होता. गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं. पुरामुळे असंख्य नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावात राहणाऱ्या निर्मला बनसोडे यांचा देखील अशाच पूरबाधितांमध्ये समावेश होतो.
advertisement

डोणगाव येथे राहणाऱ्या निर्मला बनसोडे यांचा संसार पावसामुळे उघड्यावर पडला आहे. त्यांनी दोन बचत गटांकडून प्रत्येकी 35 हजार आणि 50 हजार रुपयांचं कर्ज घेऊन पत्र्याचं शेड उभं केलं होतं. या शेडमध्ये त्या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला. या पुराचं पाणी गावात शिरलं. निर्मला यांच्या घराच्या पाठीमागे असलेली विहिर देखील पाण्याखाली गेली परिणामी हे पाणी घरात शिरलं.

advertisement

रेड अलर्ट...! सोलापुरात महापुराचा धोका वाढला, 48 तास धो धो कोसळणार, तापमानात मोठे उलटफेर

जीव वाचवण्यासाठी निर्मला बनसोडेंच्या कुटुंबातील 11 जणांनी रात्री 2 वाजता घर सोडलं. संसार उपयोगी साहित्य, मुलांचे कपडे, नातवंडाचे कपडे, दोन गाड्या तिथेच सोडावं लागलं. लहान लेकरं आणि 5 शेळ्यांना घेऊन त्यांनी सुरक्षित ठिकाण गाठलं. सकाळी जाऊन पाहिलं असता सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये निर्मला यांचं पत्र्याचं शेड पाण्याखाली गेलं होतं. मुलांच्या दुचाकी देखील दिवस नव्हत्या. या गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत की वाहून गेल्या, याची देखील कल्पना नसल्याचं निर्मला यांनी सांगितलं.

advertisement

बचत गटांचं कर्ज काढून राहण्यासाठी निवारा केला होता. पुराच्या पाण्याने तोही गिळून टाकला. पै-पै जमा करून उभा केलेला संसार तर सगळाच उद्ध्वस्त झाला आहे. अशा स्थितीत आता कर्ज कसं फेडायचं, असा प्रश्न निर्मला यांच्यासमोर उभा राहिला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Flood: कर्ज काढून बांधलेला निवाराही पुराने गिळला, आता जगायचं कसं? सोलापुरातील महिलेने फोडला टाहो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल