TRENDING:

सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, घेतली स्कॅमरची फिरकी; म्हणायला लावलं मराठी गाणं, VIDEO

Last Updated:

महानगर गॅसच्या नावाखाली अनेकांना फ्रॉड कॉल्स येत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने फ्रॉड कॉल करणाऱ्याची फिरकी घेत मजेशीर व्हिडीओ शेअर केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महानगर गॅसकडून अनेकांना फ्रॉड कॉल येत आहेत. याआधी अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला फ्रॉड कॉल आला होता. त्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही त्यांना फ्रॉड कॉल आल्याचं सांगत व्हिडीओ शेअर केला होत. कलाकारांनी नागरिकांना अशा फ्रॉड कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान ही घटना पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर घडली. पण फ्रॉड कॉल करणाऱ्याची सिद्धार्थ चांगलीच फिरकी घेतली. मजेशीर पण तितकाच सतर्क करणारा व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
News18
News18
advertisement

"Mahanagar Gas Fraud Call. It was fun! सोनुरी काठे. झालाला. कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला whatsapp वर चॅट करायला सांगत नाही. खूप लोक ह्याला बळी पडत आहेत. सर्वांनी काळजी घ्या. आणि त्यांची मजा घ्या" असं म्हणत सिद्धार्थने व्हिडीओ शेअर केला आहे.

( Bigg Boss नंतर पिक्चरचा हिरो झाला छोटा पुढारी! थिएटरमध्ये करणार राडा, फर्स्ट लुक आऊट )

advertisement

व्हिडीओमध्ये सिद्धार्थ म्हणतोय, "महानगर गॅस जो महाराष्ट्र का गॅस हैं वहा मराठी अलाऊ नही है. आप मेरे लिये एक मराठी वर्ड बोल दो. में तुरंत आपको मेसेज करूंगा. में आपको बताता हूं." सिद्धार्थने फ्रॉड कॉल करणाऱ्याला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम सिनेमातील स्वर्गात आकाश गंगा हे गाणं म्हणायला लावलं. गाणं म्हणायला लावताच समोरच्याची बोबडी वळली.

advertisement

महानगर गॅसच्या नावाखाली फ्रॉड कॉल करून व्हॉट्स अॅप पाठवलेली APK फाइन ओपन करायला सांगितली जाते. ती फाइल ओपन केल्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे रिकामी होऊ शकतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबर देखील असाच प्रकार घडला. पण वेळीच सावध होऊन त्यांनी फ्रॉड कॉल करणाऱ्या स्कॅमर्सना धडा शिकवला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचा क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर सिद्धार्थ चांदेकर मिसेस देशपांडे या वेब सीरिजमध्येही दिसला. अभिनेत्री माधुरी दीक्षितबरोबर त्याने स्क्रिन शेअर केली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, घेतली स्कॅमरची फिरकी; म्हणायला लावलं मराठी गाणं, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल