गौतमी पाटीलची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रात आहे. स्टेज डान्सर असलेली गौतमी आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर देखील झळकू लागली आहे. गौतमीची अनेक गाणी मधल्या काळात रिलीज झालीत. तिचं खास गाणं असलेला आतली बातमी फुटली या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
advertisement
या सिनेमात गौतमी आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर 'सखूबाई'हे झक्कास गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. एका मुलाखतीत गौतमीचं कौतुक करत सिद्धार्थ म्हणाला, "आमची टेक्निकल टीम कमालच आहे. सेट एका दिवसात केला. ते गाणं आम्ही एका रात्रीत केलं आहे. पण तो सेटअप बघितला तर तुम्हाला वाटणार नाही. आम्ही हे गाणं खूप मेहनतीने केलं."
सिद्धार्थ पुढे म्हणाला, "गौतमीचा एक ऑरा आहे, छान आहे. मस्त आहे. मला छान का वाटतं कारण हे सगळे लोक आपल्या आयुष्यात छान काही अचिव्ह करतात, पण ते नम्र असतात. तो नम्रपणा खूप वर्क होतो. गौतमी पाटीलमध्ये तो नम्रपणा आहे. की दादा कसं झालं, दादा मॉनिटर बघूया. तू मस्त कर, चांगलं कर मी या लेव्हलला होतो."