सिद्धार्थचा ‘ये रे ये रे पैसा 3’ हा सिनेमा 18 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय विनोदी-थ्रिलर सिनेमाचा तिसरा भाग आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमात उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा पैशाच्या लोभामुळे निर्माण होणाऱ्या गोंधळ आणि विनोदावर आधारित आहे. 2 तास 19 मिनिटांचा हा सिनेमा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत आहे.
advertisement
( 'शिवसेनेचा अवधूत, अवधूतची शिवसेना', बाळासाहेब ठाकरे अवधूत गुप्तेकडे बघून असं का म्हणायचे! )
'ये रे ये रे पैसा 3' हा सिनेमा थिएटरमध्ये हाऊसफुल असल्याचं दिसतंय. सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह सिद्धार्थने शेअर केलेला फोटो पाहून चाहतेही भावूक झालेत. अनेक मराठी कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "This is the moment Housefull Cinema … येरे येरे पैसा ३ Thnx for your love n support.. Kamal feeling.. Lv u team"
या पोस्टसोबत त्याने एक फोटो शेअर केला, ज्यात तो थिएटरमध्ये उभा आहे. प्रेक्षक सिनेमा पाहत आहेत आणि त्यांच्या नकळत तो एका साइडला उभा राहून सिनेमा पाहतोय. हा फोटो प्रचंड बोलका असून फोटोवरून नजर हटत नाहीये. सिद्धार्थने गुपचूप थिएटरला भेट देऊन प्रेक्षकांसोबत सिनेमा पाहिला. हा फोटो आणि त्याची पोस्ट प्रेक्षकांचं प्रेम दाखवतोय. थिएटरमध्ये सिनेमा संपल्यानंतर सिद्धार्थने प्रेक्षकांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर फोटो काढले आणि त्यांचे आभारही मानली.
सिद्धार्थच्या या फोटोवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. अभिनेता आशय कुलकर्णीनं 'भावा' अशी कमेंट करत 'हार्ट इमोजी' शेअर केला आहे. अभिनेत्री कविता मेढेकर यांनी लिहिलंय, 'किती गोड फोटो'. अभिनेता क्षितिज दाते याने 'वॉट अ फोटो' अशी कमेंट करत 'हार्ट इमोजी' शेअर केला आहे.
सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनीही कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलंय, 'हा माणूस मोठा होतो ना.. तेव्हा वाटत आपण पण मोठे झालो. अभिमान आहे पण गर्व नाही. जाणीव आहे असा कलाकार.' दुसऱ्या युझरने लिहिलंय, 'मराठी माणूस & मराठी माणसाची जाणीव म्हणूत तर माजा भाऊ मराठी माणसात उभा'