सोनपरी मालिकेत फ्रूटीची भुमिकाही खूप गाजली. अभिनेत्री तन्वी हेगडे हिनं फ्रूटीची भुमिका साकारली होती. तिच्याबरोबर नेहमी परी आणि अल्टू अंकल असायचे. सोनपरीमधील फ्रूटी आता मोठी झाली आहे. ती आता 24 वर्षांची असून तिनं सोनपरी म्हणजेच मृणाल कुलकर्णी आणि अल्टू अंकल म्हणजेच अशोक लोखंडे यांच्याबरोबर फोटो शेअर केले आहेत.
( आता काय करतात CIDमधील कलाकार? अभिनय सोडून एक झालीये बिझनेसवुमन )
advertisement
या तिघांचा हा फोटो त्यांच्या सोनपरी मालिकेतील फोटोशी कंपेर केला जात आहे. या फोटोंनी अनेकांच्या सोनपरीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. तिघांचा फोटो पाहून आता सोनपरी 2 येणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.
तन्वीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं मृणाल कुलकर्णी आणि अशोक लोखंडे यांच्याबरोबर सिंगल फोटो शेअर केलेत. या फोटोंबरोबर तिनं पोस्टमध्ये लिहिलंय, तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की आम्ही का भेटलो आहोत? आम्ही अजूनही संपर्कात आहोत का? आम्ही पुन्हा एकदा एका फ्रेममध्ये दिसणार का? आम्ही तुमच्यासाठी असं काय केलं आहे. सेटवरचे माझे आई-वडील आणि सगळ्यात चांगले सहकलाकार. आठवणींचा एक सुंदर प्रवास.
अभिनेत्री तन्वी हिनं सोनपरीबरोबरच शाका लाका बूम बूम, हिप हिप हुर्रे सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. ती सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. 2016मध्ये ती एका मराठी सिनेमात दिसली होती.
