लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासाठी 5 ऑगस्ट 2025 हा दिवस आयुष्यातला अविस्मरणीय ठरला. कारण, लहानपणापासून जिची ती प्रचंड चाहती होती ती बॉलिवूडची सुपरस्टार काजोल तिच्यासमोर तिला प्रत्यक्ष नृत्यसादरीकरण करण्याची संधी मिळाली.
'नियती फार क्रूर, जखमा..' रक्षाबंधनाच्या दिवशी कुशल बद्रिकेचे हृदयस्पर्शी पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सोनालीने काजोलच्या काही गाजलेल्या गाण्यांवर थिरकून उपस्थितांची मने जिंकली. "मेरे ख्वाबों में जो आए" पासून ते "सूरज हुआ मद्धम" पर्यंतच्या हिट गाण्यांवर सोनालीचा नृत्याविष्कार पाहून काजोलही भारावून गेली. सादरीकरणानंतर तिने सोनालीला मिठी मारून कौतुक केलं.
advertisement
हा क्षण सोनालीसाठी फक्त एक परफॉर्मन्स नव्हता, तर तिचं लहानपणीचं स्वप्न होतं. सोशल मीडियावर आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, "काजोलचा निखळ अभिनय, बिनधास्त स्वभाव आणि ऑनस्क्रीन-ऑफस्क्रीन जिवंतपणा मला नेहमीच प्रेरणा देतो. तिच्यासमोर नाचण्याची संधी म्हणजे माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे."
याआधी सोनालीला श्रीदेवी आणि लता मंगेशकर यांना मानवंदना देण्याची संधी मिळाली होती. पण यावेळी, काजोलच्या वाढदिवशी, तिच्यासाठी खास डान्स करणे हा एक अनोखा अनुभव होता. सोहळ्यात काजोलला 'राजकपूर विशेष योगदान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आलं. तिचा वाढदिवस असल्याने हा आनंद दुप्पट झाला. पुरस्कार स्वीकारताना तिची आई, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, देखील मंचावर उपस्थित होत्या.
