TRENDING:

'असा कसा हा नियतीचा खेळ...' दोन दिग्गजांच्या निधनानं हादरली सोनाली; भावुक होत शेअर केली पोस्ट

Last Updated:

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तर आज प्रसिद्ध कवी ना.धो.महानोर यांनी देखील आज जगातून एक्झिट घेतली. या दोघांच्या आकस्मिक निधनावर आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 03 ऑगस्ट : काल चित्रपत्रसृष्टीतुन एक धक्कादायक बातमी समोर आली. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अनेक कलाकारांनी समोर येत याविषयी स्पष्ट प्रतिक्रिया दिली तर अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. दरम्यान, आज देखील चित्रपटसृष्टीतुन एक वाईट बातमी आली. प्रसिद्ध कवी ना.धो.महानोर यांनी देखील आज जगातून एक्झिट घेतली. या दोघांच्या आकस्मिक निधनावर आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
advertisement

नितीन चंद्रकांत देसाई आणि प्रसिद्ध कवी ना.धो.महानोर या दोघांसोबत सोनाली कुलकर्णीने एक फोटो शेअर केला आहे. 'अजिंठा' या सिनेमात सोनालीने या दोघांसोबत काम केलं होतं. सोनालीच्या 'अजिंठा' या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलं होतं. हा चित्रपट त्यांच्याच 'एन.डी स्टुडिओज' मध्ये संपूर्णपणे शूट करण्यात आला होता. तर या चित्रपटाची कथा ना. धो. महानोर यांच्या 'अजिंठा' या पुस्तकावर आधारित होती. आता अवघ्या ४८ तासांच्या आत अजिंठा या चित्रपटाशी संबंधित दोन व्यक्तींनी या जगातून निरोप घेतला. दोघांच्याही निधनाच्या बातम्या ऐकून सोनाली हादरली आहे. तिने या दोघांविषयी एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

advertisement

सई ताम्हणकरचं पहिलं प्रेम होता हा अभिनेता; पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करताना झाली अशी फजिती

सोनालीनं या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर…..असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील...आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की...'

advertisement

नितीन देसाई यांच्याविषयी ती पुढे म्हणाली, '#NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect #Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं''

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

तर ना. धो. महानोर यांच्याविषयी सोनालीने लिहिलंय कि, ''ना रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील... भावपूर्ण श्रद्धांजली''

मराठी बातम्या/मनोरंजन/
'असा कसा हा नियतीचा खेळ...' दोन दिग्गजांच्या निधनानं हादरली सोनाली; भावुक होत शेअर केली पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल