आदित्य राजपूत असं या अभिनेत्याचं नाव आहे. आदित्य राजपूतच्या निधनानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. सुरुवातीला लोकांनी याला आत्महत्या मानले होते, पण नंतर असे म्हटले गेले की तो ड्रग्स घेत होता आणि त्यांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोसमुळे झाला. त्याचबरोबर एक मोठा प्रश्न हाही उभा राहिला की, त्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट कधीच जगजाहीर करण्यात आले नाहीत. आदित्यने इंडस्ट्रीमध्ये काम करताना केवळ नावच नाही, तर अनेक मित्रही कमावले होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
advertisement
Amitabh Bachchan : तोंडात सिगरेट अन् थेट बारमध्येच घुसले बिग बी; अमिताभचा 'हा' किस्सा आजवर कोणालाच माहिती नाही
काय घडलेलं 'त्या' रात्री?
21 मे 2023 रोजी आदित्यने आपल्या घरी मित्रांसाठी एका पार्टिचे आयोजन केले होते. आपल्या सोशल मीडियावर त्याने या पार्टीतले काही फोटोदेखील शेअर केले होते. पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी 22 मे रोजी बाथरूममध्ये अभिनेत्याचा मृतदेह मिळाला होता.
अंधेरी पोलिसांच्या मते, आदित्यच्या कुकने बाथरूममधून जोरात आवाज ऐकला आणि तो धावत गेला. त्याने पाहिलं की, आदित्यच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता. कुक काही काळ गोंधळून गेला, पण लगेचच बिल्डिंगच्या वॉचमनकडे गेला आणि त्याला घेऊन परत आला. दोघांनी मिळून जवळच्या हॉस्पिटलमध्ये कॉल करून एक डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी तातडीने आदित्यला रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत आदित्यच्या मित्रांनाही कळवण्यात आलं होतं, जे घाईघाईत त्याच्या घरी पोहोचले. या मित्रांमध्ये आदित्यची अतिशय जिवलग मैत्रीण आणि अभिनेत्री सुबुही जोशीचाही समावेश होता.