TRENDING:

TRP मध्ये येण्याआधीच मालिकांची एकमेकांना टक्कर, 'सनई चौघडे'ला पुरून उरली 'आनंदी'

Last Updated:

दोन नव्या मालिका TRPच्या शर्यतीत येण्याआधीच एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत.  मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी मालिकाविश्वात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नव्या मालिका सुरू होताच जुन्या मालिका ऑफ एअर जातात. पण दोन वहिन्यांच्या दोन नव्या मालिका TRPच्या शर्यतीत येण्याआधीच एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत.  मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. प्रोमो रिलीज झाल्याच्या काही तासांतच मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
News18
News18
advertisement

झी मराठीवरील काही दिवसांआधी 'सनई चौघडे' या मालिकेची घोषणा करण्यात आली. मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. प्रोमो रिलीज झाल्याच्या काही तासातच त्या प्रोमोला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. मालिकेच्या प्रोमोला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

तर दुसरीकडे स्टार प्रवाहवरदेखील नव्या मालिकेच्या घोषणा करण्यात आली. आनंदी असं मालिकेचं नाव असून या मालिकेच्या प्रोमोला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेच्या प्रोमोला काही तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

advertisement

( Krantijyoti Vidyalay OTT Release : थिएटरनंतर 'क्रांतिज्योती'ची पोरं OTT गाजवणार! रिलीज डेट समोर )

मालिकेच्या शीर्षकाला साजेशी अशीच या मालिकेची गोष्ट आहे. ही कथा आहे आनंदीची. एका अपघातात दृष्टी गमावलेल्या, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची ही गोष्ट आहे.  डोळ्यांनी जग दिसत नसलं, तरी मनाने आणि संवेदनांनी आनंदी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून तिची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतरांना सहज न सापडणाऱ्या गोष्टी आनंदी सहज ओळखते. ती अत्यंत संवेदनशील असून गरजूंना मदत करणं हा तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात, पण मन कधीच नाही हा आनंदीचा जीवनमंत्र आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेणारी आनंदी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात
सर्व पहा

16 मार्च पासून ही मालिका सुरू होणार आहे पण या मालिकेची वेळ अद्याप समोर आलेली नाही. तर सनई चौघडे मालिकेची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

मराठी बातम्या/मनोरंजन/
TRP मध्ये येण्याआधीच मालिकांची एकमेकांना टक्कर, 'सनई चौघडे'ला पुरून उरली 'आनंदी'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल