संत तुकाराम यांचं जीवन, त्यांची भक्ती, त्यांचे अभंग आणि सामाजिक विचार आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 17व्या शतकातील या महान संत-कवीचं प्रेरणादायी आयुष्य ‘संत तुकाराम’ या भव्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि संत तुकाराम महाराजांची ही भूमिका सुबोध भावे साकारणार आहेत.
मित्राच्या संकटात धावून गेले नाना पाटेकर, स्वतःचं घरही गहाण ठेवलं, नेमकं काय घडलं?
advertisement
हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून, त्यात संत तुकारामांची भूमिका मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे. त्यांनी 'लोकमान्य टिळक', 'बालगंधर्व' यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधून आधीच आपली वेगळी छाप पाडली आहे. आता तुकारामांसारखा पवित्र, शांत, पण अंतर्मुख योद्धा साकारणं हेही त्यांच्या करिअरमधील मोठं टप्पा ठरणार आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केलं असून, निर्मिती बी. गौतम यांच्या कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओजने केली आहे. चित्रपटात तगडे कलाकारही आहेत. शिव सूर्यवंशी, शीना चोहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, मुकेश खन्ना, हेमंत पांडे, गणेश यादव, रूपाली जाधव आणि इतर अनेक अनुभवी कलाकार. विशेष म्हणजे, मुकेश खन्ना या चित्रपटात सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहेत. त्यांच्या आवाजातून संत तुकारामांचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवला जाईल.