दरम्यान, आज १० जानेवारीला निवेदिता सराफ ५९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी जय्यत तयारीही केली होती. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
वाढदिवशीही त्या नियमितपणे मालिकेच्या सेटवर पोहोचल्या. यानंतर त्यांच्या मेकअप रूमचा दरवाजा उघडताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची मेकअप रूम सजवून ठेवली होती. यावेळी फुले आणि रंगेबेरंगी रिबिन्सचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या रूममध्ये प्रवेश करताच निवेदिता खूश झाल्या.
advertisement
खोलीत प्रवेश करताच निवेदिता सजवलेली रूम पाहून भारावून गेल्या. त्यांनी मालिकेतील बालकलाकार कियारा मंडलीकला घट्ट मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.
अभिनेत्री निवेदिता सराफ मागील ३-४ दशकांपासून मराठी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्या उत्तम अभिनेत्री आहेतच शिवाय त्या एक उत्तम सुगरण देखील आहेत. निवेदिता या काही रेसिपीज त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर देखील करतात. ''निवेदिता सराफ रेसिपीज'' नावाचं त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.