अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती तोंडाला मास्क लावून आली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी आहे. तारक मेहता शोमध्ये कधी परतणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नुकतीच ती असीद मोदींच्या घरी गेली होती. तिथला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर दिशा वकानी थेट लालबागच्या राजाच्या मंडपात दिसली.
advertisement
लालबागच्या राजाच्या दर्शनाला दिशा वाकानी
बऱ्याच काळापासून लाईमलाईटपासून दूर असलेली दिशा वाकानी नुकतीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली. दिशा गुलाबी आणि हिरव्या ट्रेडिशनल साडीत आली होती. लालबागच्या राजाच्या मंडपात प्रवेश करताच तिने चेहऱ्याला मास्क घातला. गर्दीत तिला कोणी ओळखू नये यासाठी तिने मास्कमध्ये चेहता झाकला. लालबागच्या राजाच्या मंडपातील दिशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लालबागच्या राजाच्या मंडपात प्रचंड गर्दी असते त्यामुळे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. इतक्या गर्दीत दिशाने बाप्पाचं दर्शन घेतलं. पापाराझींनी तिला फोटोसाठी पोज देण्यास सांगितलं पण तिने नम्रपणे नकार दिला आणि थेट गाडीकडे रवाना झाली.
भक्तीभावाने केले बाप्पाचे दर्शन
दिशा वकानीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती लालबागच्या राजाचं दर्शन घेताना दिसत आहे. मंडपात प्रचंड गर्दीत आहे मात्र तिथेही ती अगदी शांत असून तिच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. चाहत्यांनी या क्षणाचं खूप कौतुक केलं. दिशाचा व्हिडीओ पाहून एका चाहत्यानं लिहिलंय, "दिशा इतक्या सहजपणे आली आणि दर्शन घेतले." दुसऱ्याने लिहिलंय, "दिशाच्या चेहऱ्यावरील हसू मन जिंकत आहे." तर काहींनी दयाबेन कधी परतरणार असे प्रश्न विचारले आहेत.
दिशा वाकानीनं प्रेग्नंसीच्या काळात तारक मेहता या शोमधून एक्झिट घेतली. त्यानंतर ती पुन्हा शोमध्ये दिसली नाही. दिशा तिच्या खास स्टाइलमुळे ओळखली जात होती. तिचा आवाज आणि तिचा अभिनय या सगळ्यामुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.