TRENDING:

Tanushree Dutta: 'मी पुरुषासोबत बेड शेअर करु शकत नाही' तनुश्री दत्ता असं का म्हणाली?

Last Updated:

Tanushree Dutta: तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ‘बिग बॉस’.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ‘बिग बॉस’. बॉलिवूड अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, गेल्या 11 वर्षांपासून निर्माते तिला सतत शोमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करत आहेत, पण तिने प्रत्येक वेळी नकार दिला.
तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ता
advertisement

तनुश्रीने सांगितले की, बिग बॉसकडून तिला मोठी रक्कमही ऑफर करण्यात आली होती. "मला 1.65 कोटी रुपये ऑफर केले होते. इतके पैसे दुसऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्रीला देण्यात आले होते, जी माझ्या दर्जाची होती. त्यांनी मला अजून जास्त पैशांचं आमिष दाखवलं, पण मी तरीही नकार दिला,” असे ती म्हणाली.

'मी त्याचं आयुष्य त्रासदायक करेन' मनोज वाजपेयींनी अनुराग कश्यपला मारला टोमणा, नेमकं काय घडलं?

advertisement

पण तिने शोमध्ये का जायचे नाही हेही स्पष्ट केले. 'बॉलीवूड ठिकाना'शी बोलताना तिने सांगितले की, “बिग बॉसमध्ये पुरुष आणि स्त्रिया एकाच बेडवर झोपतात, सतत भांडतात. मला माझी गोपनीयता आवडते. मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करू शकत नाही. त्यांनी मला चंद्र दिला तरी मी जाणार नाही. मी इतकी स्वस्त नाही.”

अभिनेत्रीने हेही सांगितले की तिला शोमध्ये असलेलं वातावरण पटत नाही. ती तिच्या डाएट आणि लाइफस्टाइलबद्दल जागरूक आहे, त्यामुळे एका रिअॅलिटी शोसाठी इतक्या गोष्टींना तडजोड करणे तिला मान्य नाही.

advertisement

‘बिग बॉस 4’मध्ये हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन फक्त 3 दिवस राहून तब्बल 2.5 कोटी रुपये घेऊन गेली होती.‘बिग बॉस 14’मध्ये अली गोनीला दर आठवड्याला 16 लाख रुपये मानधन मिळाले आणि त्याने एकूण 2.8 कोटी रुपये कमावले. रिमी सेनलाही ‘बिग बॉस 9’साठी 2 कोटी रुपये देण्यात आले होते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Tanushree Dutta: 'मी पुरुषासोबत बेड शेअर करु शकत नाही' तनुश्री दत्ता असं का म्हणाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल