कांतारा अ लेजेंड चॅप्टर 1 :
'TOP 10' चित्रपटांच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर 1' या चित्रपटाचा समावेश आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला 25.5% व्ह्यूज आहेत. 2 ऑक्टोबरला हा बहुप्रतीक्षित चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.
Rupali Bhosle Car Accident : अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची झालीये अशी अवस्था, PHOTO
advertisement
मस्ती 4 :
आगामी टॉप 10 चित्रपटांच्या यादीत 'मस्ती 4' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विवेक ओबेरॉय, अरशद वारसी, रितेश देशमुख आणि तुषार कपूर हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. आयएमडीबीच्या पेजवर या चित्रपटाला 24.5% व्ह्यूज आहेत. 21 नोव्हेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
एक दीवाने की दिवानियत :
'एक दीवाने की दिवानियत' हा चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांवर आहे. हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा हा चित्रपट 21 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयएमडीबीच्या पेजवर या चित्रपटाला 11.6% व्ह्यूज मिळाले आहेत.
सालार 2 :
प्रभासच्या 'सालार 2' या चित्रपटाची संपूर्ण भारतात चांगलीच चर्चा आहे. 14 नोव्हेंबरला हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आयएमडीबीच्या पेजवर या चित्रपटाला 9.3 रेटिंग मिळाले आहे.
सनी संस्कारी की तुलसी कुमारी :
वरुण धवन, रोहित सराफ, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा यांचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आयएमडीबीच्या पेजवर या चित्रपटाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.
थामा :
आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि परेश रावल यांचा 'थामा' हा बहुचर्चित चित्रपट येत्या 21 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल. आयएमडीबीच्या पेजवर या चित्रपटाला 7% व्ह्यूज मिळाले आहे.
रोई रोई बिनाले :
दिवंगत गायक जुबीन गर्ग यांचा 'रोई रोई बिनाले' हा सांगितीक, रोमँटिक चित्रपट आहे. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इडली कढाई :
इडली कढाई हा तामिळ चित्रपट आहे. या चित्रपटात धनुषने अभिनय करण्यासह दिग्दर्शनदेखील केलं आहे. 1 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
आन पावम पोलाथाथु और ड्युड :
'आन पावम पोलाथाथु और ड्युड' हा तामिळ विनोदी चित्रपट आहे. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
ड्यूड :
ड्यूड हा तामिळ रोमँटिक, अॅक्शन आणि विनोदी चित्रपट आहे. 17 ऑक्टोबरला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.