TRENDING:

Horror Movies : 2025 मध्ये हॉररचा थरार! 'हे' सिनेमे पाहून तुमची झोप उडणार, पाचवा तर खूपच भयानक

Last Updated:

Horror Movies 2025 : तुम्ही जर भयपटांचे चाहते असाल, तर हे 5 चित्रपट पाहायला अजिबात विसरू नका.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Horror Movies : रोमँटिक चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांना सध्या सस्पेन्स आणि थ्रिलर असणारे चित्रपट अधिक आवडू लागले आहेत. त्याचबरोबर तरुण पिढीमध्ये भयपटांबाबत जोरदार ट्रेंड पाहायला मिळतो आहे. भयपट चित्रपटांमधील दृश्यं आणि साउंड्स प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतात. त्यामुळेच लोक मोठ्या संख्येने अशा प्रकारचे भीतीदायक चित्रपट पाहणं पसंत करत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी 5 अशा धडकी भरवणाऱ्या भयपट चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत, जे पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. झोप उडवणारे हे चित्रपट आवश्य पाहायला हवे.
News18
News18
advertisement

सिनर्स (Sinners) : हॉलिवूडच्या 'सिनर्स' या चित्रपटाला नंबर वन भयपट चित्रपट मानलं जात आहे. या चित्रपटाच्या जोरदार कथानकाने आणि दृश्यांनी प्रेक्षकांचे डोके फिरवले आहेत. दरम्यान काहींना या चित्रपटाची कहाणी खूपच प्रभावी वाटत आहे.

फायनल डेस्टिनेशन (Final Destination) : 'फायनल डेस्टिनेशन' या चित्रपटाचे अनेक भाग आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत आणि प्रत्येक भागाने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच भीती निर्माण केली होती. मात्र 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स'च्या धडाकेबाज एन्ट्रीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या भागात तुम्हाला हॉररचं नेक्स्ट लेव्हल पाहायला मिळेल.

advertisement

वेपंस (Weapons) : भय आणि रहस्यांनी भरलेला 'वेपंस' हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट कधीही एकट्याने पाहण्याची चूक करू नका. 'वेपन्स' चित्रपटात असे काही भयपट दृश्य दाखवले आहेत, जे पाहून तुमच्या मनात भीती निर्माण होऊ शकते.

हार्ट आइज (Heart Eyes) : 2025 मध्ये प्रदर्शित झालेला 'हार्ट आइज' हा या वर्षातील टॉप 5 भयपटांपैकी एक आहे. निर्मात्यांनी या चित्रपटात विनोदाचा बाजदेखील ठेवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.

advertisement

ब्रिंग हर बॅक (Bring her back) : 'ब्रिंग हर बॅक' मध्ये प्रेक्षकांना भीतीचा जबरदस्त डोस मिळेल. हा भयपट पाहताना प्रेक्षकांच्या तोंडचं पाणी पळेल. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Horror Movies : 2025 मध्ये हॉररचा थरार! 'हे' सिनेमे पाहून तुमची झोप उडणार, पाचवा तर खूपच भयानक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल