६ वर्षे लागली स्क्रिप्ट लिहायला!
‘तुंबाड’ या चित्रपटाची कथा एका अशा मुलाची होती, जो एका शापित खजिन्याच्या शोधात एका राक्षसाला आव्हान देतो. या चित्रपटाने लोकांना खूपच घाबरवलं. आता ‘तुंबाड २’ साठी सोहम शाहच्या ‘सोहम शाह फिल्म्सने’ पेन स्टुडिओज सोबत काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे, ज्यांनी ‘सीता रामम’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ सारख्या मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
advertisement
सोहम शाह म्हणाला की, त्याला ‘तुंबाड २’ ची स्क्रिप्ट लिहायला ६ वर्षे लागली. त्याने सांगितलं की, “मी जयंतीलाल गाडांच्या कामाचा नेहमीच आदर केला आहे. जेव्हा मी त्यांना ‘तुंबाड २’ बद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी ५ मिनिटांत डील पक्की केली. असा विश्वास प्रत्येक दिग्दर्शकाला हवा असतो.”
‘तुंबाड २’ कधी येणार?
‘तुंबाड २’ चं शूटिंग पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. ‘तुंबाड’चे सह-दिग्दर्शक आदेश प्रसाद या नवीन भागाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘तुंबाड’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, पण २०२४ मध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यावर त्याने बजेटच्या तीन पट रक्कम कमवली, ज्यामुळे तो एक स्लीपर हिट ठरला. आता ‘तुंबाड २’ च्या माध्यमातून हा नवीन अध्याय प्रेक्षकांना कसा घाबरवतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.