या एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने अफेअर्सवर जोरदार टीका केली. 'अग्रिम-अग्रिम' सेगमेंट दरम्यान ट्विंकल आणि काजोलने "वयस्कर लोक त्यांचे अफेअर्स लहान लोकांपेक्षा चांगले लपवतात का?" असा प्रश्न विचारला. यावर ट्विंकल खन्ना लगेच सहमत झाली. तिने खिल्ली उडवली, "मोठे लोक यात पारंगत असतात, त्यांची खूप प्रॅक्टिस झालेली असते. फराह खान आणि अनन्या पांडे देखील तिच्या या मताशी सहमत झाली.
advertisement
( Madhuri Dixit : 7 चा कॉल टाइम 10 ला पोहोचली, माधुरी दीक्षितला 3 तास उशीर का झाला? कारण आलं समोर )
दरम्यान काजोल ट्विंकलच्या या मताशी असहमत होती. काजोलने तिचे मत व्यक्त करताना म्हटले, "मला वाटतं की तरुण लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वकाही लपवण्यात अधिक पटाईत असतात अगदी अफेअर्स देखील." अनन्या पांडेने उत्तर दिले की, "सोशल मीडियामुळे सर्वकाही बाहेर येतं." यावर फराह खान म्हणाली, "तरुण लोक प्रेमात नसतानाही पोस्ट करतात."
शोमध्ये पुढे "आजची मुले कपडे बदलण्यापेक्षा लवकर पार्टनर बदलतात" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानर ट्विंकलने पुन्हा यावर सहमती दर्शवली. तर इतर तिघांनीही असहमती दाखवली. ट्विंकल म्हणाली, "आमच्या काळात असे होते की, 'लोक काय म्हणतील? आपण हे करू शकत नाही.' ते (तरुण लोक) वारंवार जोडीदार बदलत आहेत आणि मला वाटते की ही चांगली गोष्ट आहे."
अनन्या पांडेने तिचे मत व्यक्त करताना म्हटले की, "हे फक्त आजच्या पिढीला लागू होत नाही. लोक नेहमीच जोडीदार बदलत असतात. पूर्वी गोष्टी शांतपणे घडायच्या." यावर ट्विंकल पुढे म्हणाली, "आता त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा भार पडत नाही. त्यांना फक्त वाटतं... जर ते काम करत नसेल तर पुढे जा."
