बिग बॉसच्या घरात वैभव आणि अरबाज एकमेकांचे खूप चांगले मित्र होते मात्र घराबाहेर आल्यानंतर दोघांची मैत्री राहिली नाही. रियुनियनसाठी घरात गेल्यानंतरही वैभवने अरबाजशी बोलणं टाळलं. अरबाजसारखा मित्र मला माझ्या आयुष्यात नको असं म्हणत त्याच्या गद्दारीला त्याने गणूजी शिर्के यांची उपमा दिली आहे.
advertisement
वैभव अभिनेता होण्याआधी त्यानं संभाजी महाराजांचं एक नाटक केलं होतं. ज्यात संभाजी महाराजांची प्रमुख भुमिका त्याने साकारली होती. वैभव म्हणाला, "गणूजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलेलं असतं. आपलाच माणूस आपल्याला सपोर्ट करत नाही. आपलाच माणूस आपल्या पाठित खंजीर खुपसतो. वैभवने पुढे त्या नाटकातील डायलॉग म्हणून दाखवला. ऐका वैभवचा पूर्ण व्हिडिओ
व्हिडिओच्या शेवटी वैभव म्हणाला, "संभाजी महाराजांना जे दु:ख त्यावेळी झालं असेल तसं दु:ख मला आज झालं. ज्या माणसासाठी आज मी भांडतोय, ज्याच्यासाठी मी काय काय करतोय तो बाहेर येऊन एका शब्दानेही म्हणत नाही की वैभव माझा मित्र आहे. वैभवला तुम्ही चुकीचं समजताय. वैभवची पर्सनॅलिटी वेगळी आहे. वैभवने असं केलेलं नाही. मी देखील वैभवच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्याची सीन्स कट केलेले आहेत. तू कशासाठी आहेस? कुठला मित्र आहेस तू? नको मला तुझी मैत्री. मी नाही केलं त्याला फॉलो, मला नकोस त्याची मैत्री. तू तुझ्या आयुष्यात खुश रहा. मला आयुष्यात परत भेटू नकोस कारण असे मित्र आयुष्यात परत नकोस".
