TRENDING:

Salim Khan Health Updates: सलीम खान यांची प्रकृती बिघडली, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले; डॉक्टर म्हणाले...

Last Updated:

Salim Khan Health Updates: ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना प्रकृती बिघडल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. उच्च रक्तदाबामुळे रक्ताच्या गाठीचे निदान झाल्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना 17 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या वृत्तांनुसार त्यांची प्रकृती स्थिर होती, मात्र त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. आता मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
News18
News18
advertisement

‘फिल्मफेअर’च्या वृत्तानुसार सलीम खान यांना चक्कर आल्याची (गिडीनेस) तक्रार झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत उच्च रक्तदाबामुळे रक्ताच्या गाठीचा (ब्लड क्लॉट) त्रास झाल्याचे निदान झाले. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून पुढील सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णाची गोपनीयता राखत अधिकृत माहिती उद्या सकाळी 11 वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली जाईल. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र क्लिनिकल स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. जलील पार्कर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

advertisement

सलीम खान यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची बातमी कळताच कुटुंबीय तातडीने रुग्णालयात दाखल झाले. सुपरस्टार सलमान खान यांना रुग्णालयात जाताना पाहण्यात आले. काळ्या टी-शर्ट आणि कॅपमध्ये साध्या वेशात ते सुरक्षा रक्षकांसह रुग्णालयातून बाहेर पडताना दिसले. मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही.

सलमान खान यांच्यासोबत सलीम खान यांच्या पत्नी सलमा आणि हेलेनही रुग्णालयात पोहोचल्या आहेत. मुलगी अलवीरा, जावई अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांनाही रुग्णालयात भेट देताना पाहण्यात आले. तसेच नातू निर्वाण आणि अरहानही आजोबांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

दरम्यान सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत चाहते सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. 90 वर्षीय सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली आणि दिग्गज पटकथालेखकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या योगदानामुळे बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट मिळाले असून त्यांनी हिंदी सिनेमाच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Salim Khan Health Updates: सलीम खान यांची प्रकृती बिघडली, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले; डॉक्टर म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल