प्रकाश राज यांच्या मातोश्री स्वर्णलता यांचं ३० मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. यावेळी कुटुंबियांनी त्याच्यावर अथोचित अंत्यसंस्कार केले. मात्र, यावरूनच ट्रोलर्सनी प्रकाश राज यांना लक्ष्य केलं आहे. प्रकाश राज हे उघडपणे स्वतःला नास्तिक मानतात आणि त्यांचा देवावर विश्वास नाही, हे त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून स्पष्ट केलं आहे. असे असताना, त्यांच्या आईच्या निधनानंतर, त्यांच्यावर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
आईच्या अंत्यसंस्कारावरून प्रकाश राज ट्रोल
स्वर्णलता यांच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच एका यूजरने प्रकाश राज यांच्या जुन्या मुलाखतीतील एक क्लिप शेअर केली, ज्यात ते स्वतःला नास्तिक म्हणत आहेत. यावेळी त्या युजरने लिहिलं की, "जे प्रकाश राज स्वतःला नास्तिक म्हणतात आणि देवावर विश्वास नाही असं सांगतात, त्यांनी स्वतःच्या आईचा दफनविधी ख्रिश्चन पद्धतीनुसार का केला?"
प्रकाश राज यांचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
प्रकाश राज यांच्यापर्यंत हे ट्विट पोहोचलं. मात्र, त्यांनी हे प्रकरण असंच सोडून न देता संबंधित यूजरला चांगलेत खडे बोल सुनावण्याचा निर्णय घेतला. प्रकाश राज यांनी ट्रोलरचं हे ट्विट रिट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, "होय, माझा देवावर विश्वास नाही, हे खरं आहे. पण माझ्या आईचा देवावर गाढ विश्वास होता. तिच्या श्रद्धेनुसार तिचे अंतिम संस्कार व्हावेत, हा तिचा अधिकार नाकारणारा मी कोण? आपण एकमेकांच्या विचारांचा जो मूलभूत आदर करतो, तोच मी इथे जपला आहे. ही साधी गोष्ट तुमच्यासारखे द्वेष पसरवणारे राक्षस कधी समजून घेणार आहात का?"
येतोय Chhaava चा सीक्वेल! विकी कौशल पुन्हा उद्ध्वस्त करणार मुघलांचं साम्राज्य, रिलीज डेट काय?
सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्या या वैचारिक प्रगल्भतेचं कौतुक होत आहे. स्वतःचे विचार वेगळे असूनही आईच्या इच्छेचा मान राखणं, हीच खरी श्रद्धा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
स्वर्णलता यांचा संघर्षमय प्रवास
प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता यांचं आयुष्य अतिशय संघर्षात गेलं होतं. त्या लहानपणी एका अनाथाश्रमात वाढल्या होत्या. तिथेच त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. पुढे त्यांनी नर्स म्हणून काम केलं आणि पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार एकटीने पेलला. प्रकाश राज आज त्यांच्या करिअरच्या शीखरावर आहेत, त्यामागे त्यांच्या आईचे मोठे संस्कार आणि मेहनत आहे. त्यामुळेच आईच्या अखेरच्या इच्छेचा मान राखणे हे प्रकाश राज यांनी आपलं कर्तव्य मानलं.
स्वर्णलता यांच्या निधनानंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी प्रकाश राज यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करत त्यांचं सांत्वन केलं आहे.
