नेमकं काय घडलं? का घेतला ब्रेक?
झाकीरने हैदराबादमधील त्याच्या एका शोमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, तो पुढील 3 ते 5 वर्षे मंचावर दिसणार नाही. या निर्णयाचे मुख्य कारण त्याचे बिघडलेले आरोग्य हे आहे.
त्याच्या सोशल मीडिया अपडेट्स आणि उपलब्ध माहितीनुसार शारीरिक थकवा (Physical Toll) असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा. गेल्या 10 वर्षांपासून झाकीर सतत दौरे (Touring) करत आहे. दिवसाला 2-3 शोज, सततचे प्रवास आणि धावपळीमुळे त्याच्या शरीरावर ताण आला आहे. यामुळे अनियमित जीवनशैली झाली आहे, कामाच्या व्यापापामुळे अपुरी झोप, विस्कळीत खाण्याच्या वेळा आणि विश्रांतीचा अभाव यामुळे तो गेल्या एका वर्षापासून आजारी आहे. प्रकृतीसोबतच काही कौटुंबिक आणि वैयक्तिक कामांसाठी त्याला वेळ द्यायचा आहे. अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
झाकीर खानला नक्की कोणता आजार झाला आहे?
विश्वासार्ह स्त्रोतांच्या माहितीनुसार, झाकीर खानला कोणताही एक विशिष्ट गंभीर आजार झालेला नाही, तर दीर्घकालीन कामाचा ताण (Burnout) आणि जीवनशैलीशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्याने स्वतः कबूल केले आहे की, "मी गेल्या एक वर्षापासून आजारी आहे, पण कामाच्या जबाबदारीमुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. आता उशीर होण्यापूर्वी थांबणे गरजेचे आहे." डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून त्याचे आरोग्य अधिक बिघडू नये.
झाकीर खानचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. 2012 मध्ये 'कॉमेडी सेंट्रल'ची स्पर्धा जिंकल्यापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या झाकीरने आपल्या साध्या, पण मर्मभेदी विनोदांनी लोकांच्या मनात घर केलं. 'हक से सिंगल' (Haq Se Single), 'काक्षा ग्यारहवी' (Kaksha Gyarvi) आणि 'तथास्तु' (Tathastu) यांसारख्या स्पेशल शोजमुळे तो घराघरात पोहोचला. गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदी भाषेत स्टँड-अप करणारा तो पहिला भारतीय कॉमेडियन ठरला.
शेवटचा शो कधी?
झाकीरने स्पष्ट केले आहे की, 20 जून 2026 पर्यंतचे त्याचे सर्व शोज हे सेलिब्रेशनप्रमाणे असतील. त्यानंतर तो मंचापासून दीर्घकाळ लांब जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या 'पापा यार' (Papa Yaar) टूरमधील काही निवडक शोज तो पूर्ण करेल.
