वृद्धापकाळाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या जरीन खान यांच्यावर आज, शुक्रवारी, मुंबईतील जुहू येथील स्मशानभूमीत हिंदू रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. जरीन खान यांच्या निधनाने अभिनेता जायद खान पूर्णपणे खचला आहे. त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
जायदने आई जरीन खानला दिला अग्नी
जरीन खान यांचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे मुलगा जायद खानने जानवे परिधान करून आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पंडितजी 'राम नाम सत्य' असे मंत्रांचे उच्चारण करताना ऐकू येत आहेत.
advertisement
सुझैन खान आणि ऋतिक रोशन
संजय खान आणि जरीन खान यांना जायद खानसोबतच सुझैन खान ही मुलगी आहे, जी अभिनेता ऋतिक रोशनची एक्स-वाईफ आहे. आईच्या निधनाने सुझैन खान खूपच भावूक झाली होती. तिने आपल्या दोन्ही मुलांसोबत आईच्या पार्थिवाला खांदा दिला. या दुःखाच्या काळात सुझैन खानला साथ देण्यासाठी ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघेही जरीन खान यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले होते.
बॉलिवूडच्या दिग्गजांची उपस्थिती
पत्नीला अखेरचा निरोप देण्यासाठी अभिनेता संजय खान स्मशानभूमीत पोहोचले होते. पत्नीच्या निधनाने ते पूर्णपणे कोसळले होते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्र त्यांना सावरताना दिसले.
जरीन खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जया बच्चन, शबाना आझमी, बॉबी देओल, पूनम ढिल्लों, जॅकी श्रॉफ, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी, अली गोनी आणि जस्मिन भसीन यांच्यासह अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. जुहू स्मशानभूमीत जरीन खान यांच्यावर करण्यात आले.
