TRENDING:

ईशान्य भारतात मोठा शोध! ब्रह्मपुत्रा नदीत सापडली माशाची नवी प्रजाती, नाव ऐकून व्हाल चकित!

Last Updated:

ब्रह्मपुत्रा नदीतील जैवविविधतेचा मोठा शोध लागला आहे. ICAR-CIFRI आणि मणिपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळून नवी माशाची प्रजाती शोधली आहे. हा मासा...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ईशान्य भारतातील नद्यांच्या जैवविविधतेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. वैज्ञानिकांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या खोल पाण्यात माशांची एक नवीन प्रजाती शोधली आहे, जिचे नाव 'पेथिया दिब्रुगढेंसिस' ठेवण्यात आले आहे. या माशाला आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी तो सापडला, त्यावरून हे नाव देण्यात आले आहे.
Pethia dibrugarhensis
Pethia dibrugarhensis
advertisement

जिल्ह्याच्या नावावरून देण्यात आलं मान

हा शोध भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) गुवाहाटी आणि बराकपूर येथील सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (CIFRI) आणि मणिपूर विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या टीमने एकत्रितपणे लावला आहे. ब्रह्मपुत्रा नदीतील गोड्या पाण्यातील जीवांचा शोध घेण्यासाठी हा सर्वेक्षण करण्यात आला होता. या नवीन प्रजातीवर आधारित संशोधन स्प्रिंगर नेचरच्या आंतरराष्ट्रीय जर्नल नॅशनल अकॅडमी सायन्स लेटर्समध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे.

advertisement

ब्रह्मपुत्रेत दडल्या आहेत अनेक प्रजाती

आयसीएआर-सीआयएफआरआयचे संचालक आणि या संशोधनाचे प्रमुख डॉ. बसंत कुमार दास म्हणाले, 'ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यात अजूनही अनेक रहस्यमय प्रजाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक नवीन प्रजातीचा शोध या भागातील जलीय परिसंस्थेबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. पर्यावरणात बदल होण्यापूर्वी या प्रजातींची नोंद करणे आणि त्यांचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.'

advertisement

मिशा नसलेला हा आहे मासा

नवीन मासा पेथिया दिब्रुगढेंसिस सायप्रिनिडे कुटुंबातील आहे आणि तो बार्ब प्रजातीचा आहे. हा मासा सामान्यतः मध्यम वेगाने वाहणाऱ्या पाण्यात आढळतो, जिथे गाळामध्ये चिखल, वाळू आणि दगड असतात. हा मासा इतर स्थानिक माशांसोबत एकत्र राहतो. या माशाची ओळख काही विशिष्ट शारीरिक लक्षणांवरून होते, जसे की अपूर्ण पार्श्वरेखा, शेपटीच्या बाजूला वर आणि खाली पसरलेला गडद काळा ठिपका आणि शरीरावर कोणताही खांद्याचा डाग आणि मिशा नसणे.

advertisement

हे ही वाचा : विषारी सापांनाही पुरुन उरणारं! 'या' प्राण्याच्या अश्रूंमध्ये दडलंय 26 प्रकारच्या विषांवरचं औषध! एक थेंब अश्रूला कोटींची किंमत!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

हे ही वाचा : General Knowledge : असा जीव ज्याचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षाही असतात मोठे, फक्त 1 टक्के लोकच सांगू शकतील अचूक उत्तर

मराठी बातम्या/General Knowledge/
ईशान्य भारतात मोठा शोध! ब्रह्मपुत्रा नदीत सापडली माशाची नवी प्रजाती, नाव ऐकून व्हाल चकित!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल