40 मिनिटांत 9 किमीचा प्रवास : CHT आणि एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणारी ही ट्रेन 9 किमीचे अंतर 40 मिनिटांत पूर्ण करते. मार्गात ती फक्त एका स्थानकावर थांबते. ही DEMU (Diesel Electric Multiple Unit) ट्रेन देशातील सर्वात लहान रेल्वे सेवांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
भारतामध्ये लहान रेल्वे मार्गांचे काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत...
advertisement
- बरकाकाना-सिधवार प्रवासी रेल्वे
- गढी हरसारू-फर्रुखनगर DEMU
- जसीडीह-बैद्यनाथधाम MEMU रेल्वे
फक्त तीन डब्बे, प्रवासी मात्र मोजकेच : ही ट्रेन तीन डब्ब्यांसह 300 प्रवाशांना बसण्याची सुविधा देते, परंतु प्रत्यक्षात फक्त 10-12 प्रवासी नियमित प्रवास करतात. यामुळे रेल्वे प्रशासनाने भविष्यात ही ट्रेन बंद करण्याची शक्यता वर्तवली आहे.
ग्रीन शटल - कोचीतील अनोखी रेल्वे सेवा : ही हिरव्या रंगाची DEMU ट्रेन दररोज दोन वेळा - सकाळी आणि संध्याकाळी धावते. ती विलिंग्डन आयलंडवरील कोचीन पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय नौदलाच्या दक्षिणी कमांडच्या परिसरातून जाते. कोचीतील एर्नाकुलम जंक्शन हे केरळमधील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक असल्यामुळे येथे ही ट्रेन थांबते.
पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू : तरीही, प्रवासी संख्या कमी असली तरी स्थानिक रहिवाशांमध्ये आणि पर्यटकांमध्ये या ट्रेनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. केरळच्या निसर्गरम्य परिसरातून जाणारा हा प्रवास अत्यंत सुखदायक आणि सुंदर वाटतो. हरित परिसरामुळे या मार्गाचा अनुभव अधिक आनंददायक ठरतो. ही ट्रेन बंद होणार की नाही, हे अजून निश्चित नाही. पण तिच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे ती भारताच्या रेल्वे इतिहासातील एक वेगळे स्थान राखून आहे.
हे ही वाचा : जगातील सर्वात उंच रस्ता कोणत्या देशात आहे? ज्याची उंची आहे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही जास्त!
हे ही वाचा : जगातल्या सर्वात खतरनाक बाॅर्डर्स, यापुढे भारत-पाकिस्तान सीमा काहीच नाही! दरवर्षी जातोय हजारो लोकांना बळी
