जगातील सर्वात उंच रस्ता कोणत्या देशात आहे? ज्याची उंची आहे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही जास्त!

Last Updated:

उमलिंगला पास, लडाख, भारत येथे जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (BRO) हा रस्ता बांधला आहे. याची उंची 19,300 फूट आहे आणि तो भारत-चीन सीमेजवळ आहे.

Umlingla Pass
Umlingla Pass
जगातील सर्वात उंच मोटर वाहतूक करण्यायोग्य रस्ता भारतात आहे. हा रस्ता लडाखच्या पूर्व भागातील उमलिंगला पास येथे 19300 फूट (5883 मीटर) उंचीवर आहे. भारतीय सीमा रस्ते संघटना (BRO) ने या रस्त्याचे बांधकाम केले आहे. याला चिसुमले-डेमचोक रस्ता असेही म्हणतात. हा 52 किमी लांब रस्ता चिसुमले आणि डेमचोकला पूर्व लडाखमधील चुमार सेक्टरशी जोडतो.

आधी हा विक्रम बोलिवियाच्या रस्त्याच्या नावावर होता

या आधी, जगातील सर्वात उंच रस्त्याचा विक्रम बोलिवियामधील उत्रुंकू ज्वालामुखीला जोडणाऱ्या रस्त्याच्या नावावर होता. तो रस्ता 18953 फूट (5777 मीटर) उंचीवर आहे. मात्र, उमलिंगला पासवरील रस्ता या उंचीच्या पलीकडे गेला आहे आणि त्याने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

स्थानिक लोकांसाठी वरदान

उमलिंगला पासमधील हा रस्ता स्थानिक लोकांसाठी वरदान ठरला आहे. कारण तो लेह शहराला चिसुमले आणि डेमचोकशी थेट जोडणारा पर्यायी मार्ग आहे. यामुळे स्थानिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास झाला आहे. शिवाय, या रस्त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, कारण हा भाग भारत-चीन सीमेजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतो.
advertisement

तिथे वजा 40 अंश तापमान!

हिवाळ्यात या भागातील तापमान -40°C पर्यंत खाली जाते. तसेच, समुद्रसपाटीपासून एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी साधारण 50 टक्क्यांनी कमी असते. या कठीण परिस्थितीतही BRO च्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अवघड परिस्थितीत हा रस्ता बांधून ऐतिहासिक कामगिरी केली. या रस्त्याचे काम ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण झाले, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 डिसेंबर 2021 रोजी याचे उद्घाटन केले.
advertisement

हा रस्ता माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही जास्त उंचीवर आहे.

  • माउंट एव्हरेस्टचा साउथ बेस कॅम्प (नेपाळ) - 17598 फूट
  • माउंट एव्हरेस्टचा नॉर्थ बेस कॅम्प (तिबेट) - 16900 फूट
  • सियाचेन ग्लेशियर - 17700 फूट
  • लेहचा खारदुंगला पास - 17582 फूट
या आकडेवारीवरून उमलिंगला पास किती उंच आहे हे सहज लक्षात येईल.

गिनीज बुकमध्ये उमलिंगला रस्त्याची नोंद

advertisement
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या पथकाने सुमारे 4 महिने सर्वेक्षण करून हा जगातील सर्वात उंच रस्ता असल्याचे प्रमाणपत्र जारी केले.
  • पहिला क्रमांक - उमलिंगला पास (भारत) - 19300 फूट
  • दुसरा क्रमांक - उत्रुंकू ज्वालामुखी रस्ता (बोलिविया) - 18953 फूट
  • तिसरा क्रमांक - माना पास रस्ता (उत्तराखंड, भारत) - 18406 फूट
ही कामगिरी भारतीय सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) कर्मचाऱ्यांच्या धैर्य, जिद्द आणि कठीण हवामानात काम करण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाली. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे!
advertisement
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
जगातील सर्वात उंच रस्ता कोणत्या देशात आहे? ज्याची उंची आहे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही जास्त!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement