...तर यामुळे असते ती कापडाची पट्टी
जेव्हा आपण हॉटेलच्या खोल्यांमध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला अनेकदा बेडच्या पायथ्याशी एक रंगीत पट्टी (ज्याला बेड रनर म्हणतात) टाकलेली दिसते. अनेकांना असा गैरसमज असतो की ती फक्त सजावटीसाठी आहे, पण सत्य यापेक्षा अधिक व्यावहारिक आहे. आदरातिथ्य तज्ञांच्या मते, हा बेड रनर केवळ सजावटीसाठी नाही तर तो स्वच्छ पांढऱ्या बेडशीटला घाणेरड्या बॅग्स, शूज किंवा बाहेरच्या कपड्यांमधून येणाऱ्या धूळ आणि घाणीपासून वाचवतो. यामुळेच हा कपडा अंथरलेला असतो.
advertisement
ती कापडाची पट्टी काढून टाका, कारण...
Homemaking.com नुसार, "लोक अनेकदा हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच त्यांच्या बॅग्ज, कोट किंवा शूज थेट बेडच्या काठावर ठेवतात. अशा परिस्थितीत, हा रनर स्वच्छ चादर किंवा ब्लँकेटला घाण होण्यापासून वाचवण्यासाठी संरक्षक थर म्हणून काम करतो." जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे शूज घालण्यासाठी बेडच्या काठावर बसतात किंवा थकल्यामुळे बॅकपॅक बेडवर फेकतात, तर ही पट्टी तुम्हाला एक सुरक्षित जागा देते. हे रंगीत कापड केवळ बेडला आकर्षक बनवत नाही तर बेडला एक व्हिज्युअल संतुलन (Visual balance) देखील देते. पण तज्ञ म्हणतात की, चादरी किंवा उशांच्या कव्हर्सइतके ते वारंवार धुतले जात नाही, त्यामुळे खोलीत प्रवेश करताच ही पट्टी बेडवरून काढून टाकणे चांगले राहील, विशेषतः जर तुम्ही तिचा वापर करणार नसाल.
खोलीत प्रवेश करताच या गोष्टी लक्षात ठेवा
एका अलीकडील अहवालात, लॉकस्मिथ डार्टफोर्डच्या सुरक्षा तज्ञांनी सांगितले की, हॉटेलच्या खोल्यांमध्ये काही ठिकाणे अशी असतात जी स्वच्छ दिसतात पण जंतूंचे केंद्र असतात – बेडस्प्रेड, सजावटीच्या उशा आणि थ्रो ब्लँकेट्स. या वस्तू अनेक महिने धुतलेल्या नसतात, ज्या दरम्यान मृत त्वचा, लाळ, शरीरातील द्रव आणि धूळ जमा होऊ शकते. तज्ञ बेड रनर्स आणि सजावटीच्या उशा खोलीत प्रवेश करताच काढून टाकण्याचा सल्ला देतात. शॉवर घेण्यापूर्वी, एक मिनिट गरम पाणी चालू ठेवा जेणेकरून बॅक्टेरिया निघून जातील. टीव्ही रिमोट सॅनिटाइज करा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. बाथटब वापरण्यापूर्वी तो शाम्पू किंवा शॉवर जेलने हलकेच स्वच्छ करा. अशा मनोरंजक बातम्या वाचण्यासाठी कनेक्टेड रहा.
हे ही वाचा : कागदापासून नाही, तर कशापासून बनवली जाते भारतीय चलनी नोट? उत्तर ऐकून व्हाल चकित!
हे ही वाचा : 'या' देशात 70% मुस्लीम लोकसंख्या, तरीही 'बुरखा' घालण्यावर आहे बंदी! इतकंच नाहीतर 'हिजाब'ही...