कागदापासून नाही, तर कशापासून बनवली जाते भारतीय चलनी नोट? उत्तर ऐकून व्हाल चकित!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मागील काही वर्षांत भारतात डिजिटल पेमेंट खूप लोकप्रिय झाले आहे. तरीही, आजही रोजच्या व्यवहारात रोख पैसे म्हणजेच नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आपण सगळ्यांनी 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या आहेत, पण या नोटा कशा बनतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
तुम्ही शाहिद कपूरची 'फर्जी' (Fargey) ही वेब सीरिज पाहिली असेल, ज्यात तो अगदी हुबेहूब दिसणाऱ्या खोट्या नोटा बनवतो. पण खऱ्या नोटा कशा बनतात, हे तुम्हाला माहीत आहे का? नुकतेच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी विचारले की, भारतीय नोटा कशापासून बनलेल्या असतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर कदाचित अनेकांना माहीत नसेल.
advertisement
advertisement
अनेकांना वाटते की, या नोटा कागदाच्या बनलेल्या असतात, कारण त्या ओल्या होतात, फाटतात किंवा खराब होतात. पण हे खरे नाही. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नुसार, भारतीय नोटा कागदापासून बनवलेल्या नसतात, तर त्या 100% कापसापासून (रुई) बनलेल्या असतात. भारतीय नोटा टिकाऊ आणि जास्त काळ सुरक्षित राहाव्यात यासाठी कागदाऐवजी शुद्ध कापसाचा वापर केला जातो.
advertisement
advertisement
भारतीय नोटांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे खऱ्या आणि खोट्या नोटांमधील फरक ओळखता येतो. या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये चांदीच्या रंगाचा मशीन-वाचनीय सुरक्षा धागा, रिझर्व्ह बँकेचा शिक्का आणि गव्हर्नरची स्वाक्षरी, सी-थ्रू रजिस्टर (दोन्ही बाजूंच्या डिझाईन्स एकत्र करून बनलेला नमुना), वॉटरमार्क आणि इलेक्ट्रोप्रकारचा वॉटरमार्क (पाण्यातील चिन्ह), मायक्रो लेटरिंग (RBI आणि मूल्य लहान अक्षरात लिहिलेले), आणि लॅटंट इमेज (कोन बदलल्यावर दिसणारे छुपे चिन्ह) यांचा समावेश असतो. ही वैशिष्ट्ये भारतीय नोटांना खोट्या नोटांपासून सहज वेगळे करतात.
advertisement
advertisement