TRENDING:

Google Googly 01: 'गुगल'ला आधी काय म्हणायचे? 'बॅकरब'शी काय कनेक्शन, एका 'टायपो'मुळे घडला इतिहास

Last Updated:

Today's Google Googly: आज जगाला माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध करून देणाऱ्या Google चे खरे नाव काय होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे आजचे Google हे नाव 'एकावर 100 शून्य' या गणितीय संकल्पनेशी संबंधित 'गूगोल' शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीतून आले आहे. ज्याचा इतिहास खूप रंजक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलचे खरे नाव किंवा त्याचे सुरुवातीचे नाव काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? रोज अगदी मोठ्या आणि किरकोळ गोष्टीसाठी गुगल करणाऱ्या आपल्यापैकी फार कमी लोकांना गुगलचे ओरिजनल नाव माहिती आहे. गुगल या कंपनीची सुरुवात आणि त्याच्या नावाचा इतिहास हा फार रंजक आहे.
News18
News18
advertisement

गुगलने सुरुवातीला 'बॅकरब' (Backrub) या नावाने आपला प्रवास सुरू केला होता. विशेष म्हणजे गुगल हे नाव 'गूगोल' (Googol) या शब्दाचे स्पेलिंगमधील एक चुकीचे रूपांतरण (टायपो) आहे. 'गूगोल' ही एक गणितीय संकल्पना आहे. ज्यामुळे 'एकावर 100 शून्य' (one with a hundred zeros) दर्शविले जातात. कंपनीच्या माहितीनुसार हे नाव कंपनीच्या मोठ्या दृष्टिकोनाला समर्पित आहे. गुगलचे ध्येय जगातील सर्व माहिती सर्वांसाठी उपलब्ध करणे हे आहे आणि हे नाव त्याच ध्येयाचे प्रतीक आहे.

advertisement

1996 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील (Stanford University) लॅरी पेज (Larry Page) आणि सर्जी ब्रिन (Sergey Brin) या दोन पदवी विद्यार्थ्यांनी 'बॅकरब' नावाचे सर्च इंजिन (search engine) तयार केले. या सर्च इंजिनचे नाव 'बॅकरब' ठेवण्याचे कारण ते वेबसाइट्सच्या 'बॅकलिंक्स'चे (backlinks) विश्लेषण करून सर्च रिजल्ट्स दाखवत होते. बॅकलिंक्स म्हणजे इतर वेबसाइट्सने दिलेले संदर्भ होय.

advertisement

नावामागील रोचक इतिहास आणि अर्थ

मात्र लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांना 'बॅकरब' हे नाव फारसे आकर्षक वाटले नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीसाठी एक नवीन नाव शोधायला सुरुवात केली. अनेक नावांवर विचार केल्यानंतर त्यांना 'गूगोल' हे नाव आवडले. 'गूगोल' म्हणजे १ नंतर १०० शून्य. ही संख्या इंटरनेटवरील प्रचंड माहिती दर्शवण्यासाठी योग्य होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

1997 मध्ये कंपनीचे नाव अधिकृतपणे 'गुगल' असे ठेवण्यात आले. 'गूगोल' शब्दाचे स्पेलिंग चुकल्याने 'गुगल' हे नाव तयार झाले. परंतु हेच नाव आज जगभर प्रसिद्ध आहे. गुगलने केवळ सर्च इंजिनमध्येच नव्हे तर अनेक प्रकारच्या सेवांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गुगल आज जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली कंपन्यांपैकी एक आहे. गुगलमुळे जगातील माहिती आता आपल्या सर्वांच्या बोटांवर उपलब्ध आहे. जे कंपनीच्या नावाच्या अर्थाला पूर्णपणे न्याय देते.

advertisement

मराठी बातम्या/General Knowledge/
Google Googly 01: 'गुगल'ला आधी काय म्हणायचे? 'बॅकरब'शी काय कनेक्शन, एका 'टायपो'मुळे घडला इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल