मृत्यूपूर्वी माणसाला दिसतो 'लाईफ रिव्ह्यू'
वैज्ञानिक संशोधनात असे आढळून आले आहे की, मरण्याच्या आधी माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे क्षणचित्र पाहतो. याला ‘लाईफ रिव्ह्यू’ असे म्हणतात. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अनेक लोकांनी आपल्या अनुभवांमध्ये सांगितले आहे की, त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य एका क्षणात झरकन सरकले.
87 वर्षीय व्यक्तीवर प्रयोग
advertisement
वैज्ञानिकांनी हा अभ्यास 87 वर्षीय एका हृदयविकाराच्या झटक्याने पीडित रुग्णावर केला. या रुग्णाच्या डोक्यावर इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (EEG) उपकरण लावण्यात आले होते, जे मेंदूतील लहरी मोजते. मरण्याच्या 30 सेकंद आधी आणि 30 सेकंदानंतर मेंदूच्या हालचालींची नोंद घेतली गेली. या संशोधनात असे दिसून आले की, मेंदू मृत्यूनंतरही काही वेळ कार्यरत राहतो आणि विशेषतः आठवणी जपणारे भाग अधिक सक्रिय होतात.
मेंदू मृत्यूसाठी स्वतःला तयार करतो?
केंटकी विद्यापीठाचे डॉ. अजमल गेमर यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी आणि त्यानंतरही मेंदूमध्ये ‘गॅम्मा ऑस्सिलेशन्स’ नावाच्या लहरी सक्रिय होतात. या लहरी आठवणींशी संबंधित असतात. वैज्ञानिकांचे मत आहे की, मेंदू मृत्यूच्या दिशेने जाताना स्वतःला तयार करतो आणि जीवनातील महत्त्वाचे क्षण पुन्हा पाहतो. डॉ. गेमर म्हणतात की, “ही बाब आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे, कारण मृत्यूपूर्वी व्यक्तीला आपले चांगले क्षण आठवतात.”
कशा पद्धतीने करण्यात आला प्रयोग?
या अभ्यासाचा अहवाल 2022 मध्ये ‘फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्स’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा रुग्ण कॅनडातील होता आणि त्याच्यावर अपस्मार (एपिलेप्सी) चा उपचार सुरू होता. त्याच्या डोक्यावर EEG उपकरण बसवले होते, जे मेंदूतील विद्युत लहरी टिपते. नंतर त्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मृत्यू पावला. मात्र, त्या मशीनने त्याच्या मेंदूतील हालचालींची नोंद घेतली आणि हे महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले.
मृत्यूपूर्वी आठवणींचा प्रवास
ही संशोधन प्रक्रिया वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, यातून असे दिसून आले की, मेंदू मृत्यूच्या क्षणीही सक्रिय असतो आणि जीवनातील आठवणी पुन्हा उलगडतो. मृत्यूच्या भीतीत असलेल्या लोकांसाठीही ही माहिती शांतता देणारी ठरू शकते, कारण मरण्याच्या आधी माणसाला त्याच्या सर्वात आनंदी आणि महत्त्वाच्या क्षणांचा आढावा घेता येतो.
हे ही वाचा : पासपोर्टशिवाय जग फिरू शकतात या 3 खास व्यक्ती! कोण आहेत या मोठ्या हस्ती?
हे ही वाचा : जगातील सर्वात उंच रस्ता कोणत्या देशात आहे? ज्याची उंची आहे माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही जास्त!
