पिलिभीत व्याघ्र प्रकल्पात 350 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी ओळखले गेले आहेत. म्हणूनच इथून रोज वेगवेगळ्या दुर्मिळ वन्यजीव आणि पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडिओ येत असतात. हल्लीच पिलिभीत व्याघ्र प्रकल्पात एका मोराचा पंख पसरवून नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. साधारणपणे मोराच्या नृत्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना बघायला मिळतात. त्यातली सगळ्यात जास्त लोकांमध्ये असलेली कल्पना म्हणजे पाऊस येण्याआधी मोर नाचतो. पण खरं नाही.
advertisement
मोरांचा मिलनाचा काळ कोणता असतो?
वन्यजीव तज्ज्ञ प्रांजली भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, हे खरं आहे की पावसाळ्यात मोर नाचताना दिसतात. पण ते लांडोर आकर्षित करण्यासाठी असं करतात. मोरांचा मिलनाचा काळ वसंत ऋतूपासून पावसाळ्याच्या अखेरीपर्यंत (फेब्रुवारी ते ऑगस्ट) असतो. याच काळात मोराचे नवीन पंख येतात. म्हणूनच मोर आपले पंख पसरवून लांडोरसमोर प्रदर्शन करतो. कधीकधी एकापेक्षा जास्त मोरसुद्धा असं करताना दिसतात.
लांडोर आकर्षित करण्यासाठी नाचतात
प्रांजली भुजबळ यांनी सांगितलं की, पावसाळ्यात लांडोर आकर्षित करण्यासाठी मोर तिच्याभोवती नाचतो. लांडोर मोराच्या हालचाली बारकाईने बघते. नाचणाऱ्या मोरांपैकी एकाला निवडण्याचा अधिकार तिला असतो. मग ती त्या मोरासोबत जोडी बनवते, ज्यामुळे येणारी पिढी नैसर्गिकरित्या तंदुरुस्त आणि निरोगी राहील.
हे ही वाचा : उन्हाळ्यात आरोग्य राखायचंय? तर आहारात घ्या 'ही' पांढरी वस्तू; पोट राहील थंड अन् त्वचेवर येईल तेज
हे ही वाचा : नव्या माठातील पाणी थंड का होत नाही? त्यामागे आहेत 'ही' 3 कारणं, करा 'हे' 2 उपाय; पाणी मिळेल थंडगार
