ते सकाळी उठून फ्रेश होतात आणि ऑफिसला जातात, आणि संध्याकाळी किंवा रात्री परतल्यावर आंघोळ करून ताजेतवाने होतात. ते म्हणतात की, आंघोळ फक्त संध्याकाळी किंवा रात्री करणे योग्य आहे. जगभरात आंघोळीच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत, आंघोळीची वेळही वेगवेगळी आहे. अमेरिकन आणि युरोपियन लोकंही सकाळी आंघोळ करतात, पण आशियाई देश असं वेगळं का करतात? विज्ञानानुसार आंघोळीची कोणती पद्धत अधिक चांगली आहे?
advertisement
जपान, कोरिया आणि चीनमध्ये रात्री आंघोळ करण्याची सवय
जपान, कोरिया आणि चीनमध्ये प्राचीन काळापासून रात्री आंघोळ करण्याची सवय आहे. तिथे असं मानलं जातं की, रात्री आंघोळ केल्याने दिवसा शरीरावर जमा झालेले विषारी पदार्थ आणि घाण निघून जाते आणि शरीरही शांत होतं. कोरियामध्येही, लोकं दिवसभर काम करून संध्याकाळी घरी पोहोचल्यावर शरीर शांत करण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी रात्री आंघोळ करणं पसंत करतात. मात्र, अमेरिका, युरोप आणि कॅनडासारख्या पाश्चात्य संस्कृतींमध्ये सकाळी आंघोळ करणं पसंत केलं जातं.
चिनी लोकं रात्री आंघोळ करतात
चिनी संस्कृतीत, रात्री आंघोळ करणं हा दैनंदिन स्वच्छतेचा आवश्यक भाग मानला जातो. असं मानलं जातं की, रात्री आंघोळ केल्याने दिवसा बाहेर फिरल्यामुळे मिळणारी सर्व नकारात्मक ऊर्जा आणि ताण दूर होतो. यामुळे शरीर ताजेतवाने होतं आणि रात्री चांगली झोप लागते. चीनमध्ये हवामान अधिक दमट आणि उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे, तिथे लोकांना खूप घाम येतो. यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते आणि संसर्ग पसरण्यास प्रतिबंध होतो.
चीनमधील लोकांचा असा विश्वास आहे की, रात्री आंघोळ केल्याने केवळ चांगली झोपच लागत नाही, तर आरोग्य आणि उत्पादकताही सुधारते. चीनचं हवामान अधिक दमट आणि उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे, तिथे लोकांना खूप घाम येतो. यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते आणि संसर्ग पसरण्यास प्रतिबंध होतो.
चांगली झोप लागते
स्वच्छतेच्या फायद्यांव्यतिरिक्त, रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणं हा दिवसभरानंतर आराम करण्याचा एक मार्ग म्हणूनही पाहिला जातो. जपानी लोकांसाठी आराम करण्याचा आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या रात्रीच्या झोपेची तयारी करण्याचा हा काळ असतो. जपानी लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी आंघोळ करता, तेव्हा शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात आणि यामुळे झोपायला गेल्यावर चांगली झोप लागते. आंघोळीची प्रथा जपानी परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे.
रात्री आंघोळ करण्याचं एक कारण
त्यांच्या कामाच्या संस्कृतीशी संबंधित आहे. अनेक जपानी कामगारांचे दिवस लांब आणि तणावपूर्ण असतात, ते अनेकदा संध्याकाळपर्यंत काम करतात. झोपण्यापूर्वी आंघोळ करणं हा शरीराला काम संपलं आणि आराम करण्याची वेळ आली आहे, हे सांगण्याचा एक मार्ग आहे. यामुळे ताण कमी होतो आणि मानसिक आणि शारीरिक आराम मिळतो, ज्यामुळे झोप लागणं सोपं होतं.
लोकं सकाळी ऐवजी रात्री आंघोळ का करतात?
मात्र, काही कारणांमुळे लोकं सकाळी ऐवजी रात्री आंघोळ करणं पसंत करतात. रात्री आंघोळ केल्याने शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते, ज्यामुळे झोप लागणं सोपं होतं. गरम पाण्यामुळे स्नायू शांत होतात. शरीरावर जमा झालेली दिवसाची घाण धुतल्याने मानसिक आराम मिळण्यास मदत होते. जे लोकं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप व्यस्त असतात, ऑफिसला ये-जा करतात आणि शहरी प्रदूषणाशी झुंजतात, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
- रात्रीची आंघोळ घाम किंवा घाण धुवून टाकते.
- उष्ण आणि दमट हवामानात राहणाऱ्या लोकांना जास्त घाम येतो.
- रात्री आंघोळ केल्याने बेडशीटवर पोहोचणाऱ्या तेल आणि घाणीचं प्रमाण कमी होऊ शकतं.
- रात्री आंघोळ केल्याने त्वचेचं आरोग्यही चांगलं राहतं.
सकाळी आंघोळ करण्याचे फायदे
- दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळते.
- रात्रीचा थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटतं.
- व्यक्ती अधिक चपळ होते.
- रात्री झोपताना खूप घाम येणाऱ्यांसाठी सकाळी आंघोळ करणं गरजेचं आहे.
विज्ञान काय म्हणतं?
विज्ञान आणि तज्ज्ञांचंही असं मत आहे की, रात्री आंघोळ करणं अधिक चांगलं आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर आंघोळ केल्याने शरीर ताजतवानं होतं. दिवसभर काम करून आल्यावर आंघोळ केल्याने काही मिनिटांतच दिवसाचा सगळा थकवा दूर होतो. त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते. यामुळेच अनेक लोकं सकाळी आंघोळ करण्यासोबतच रात्रीही आंघोळ करतात. संशोधनात असं आढळून आलं आहे की, रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते.
त्यामुळे, तुम्ही रात्री आंघोळ करा किंवा सकाळी, दोघांचेही फायदे आहेत. सकाळी आंघोळ केल्यास दिवसाच्या कामात उत्साही वाटतं आणि रात्री आंघोळ केल्यास दिवसाचा थकवा दूर होऊन शरीर शांत होतं. रात्री चांगली झोप लागते. त्यामुळे, सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला आंघोळ करणं चांगलं नाही का?
हे ही वाचा : फाॅलोअर्ससाठी चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला मारली कानाखाली, RPF ने युट्युबरला शिकवला धडा, पहा VIDEO
हे ही वाचा : VIRAL VIDEO : नवरी नाही, तरीही लग्न झालं! 'डबल वरात', सोशल मीडियावर लग्नाची जोरात चर्चा