नव्या संशोधनात धक्कादायक पुरावे
या संशोधनात अशा काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या यापूर्वी फारशा परिचित नव्हत्या. त्या काळातील लोकांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धती आणि धार्मिक विधींबद्दलही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. उत्तर पाषाण युगातील (Paleolithic) युरोपियन लोक हे शिकारी आणि अन्न संकलक होते, पण ते कसे मृत्यू पावत असत, याबद्दल फारशी माहिती नव्हती. आता काही पुरावे समोर आले आहेत, ज्यामुळे मॅग्डालेनियन संस्कृतीतील अंत्यसंस्कार पद्धती आणि परंपरांविषयी काही कल्पना करता येते.
advertisement
अस्थींच्या खुणांनी संशोधक संभ्रमात
मात्र, त्या काळातील काही मृतदेहांवरील हरवलेल्या हाडांमुळे विविध शक्यता निर्माण झाल्या. असे दिसून आले की, काही ठराविक हाडे मुद्दाम निवडून वेगळी ठेवली जात होती. मॅग्डालेनियन लोक मानवाच्या हाडांचा दागिन्यांसाठी वापर करत आणि कवट्या कपांसारख्या वापरत, हे आधीच माहित होतं. पण हाडांवरील विशिष्ट खुणा संशोधकांना संभ्रमात टाकत होत्या.
संशोधनात नरभक्षणाचे स्पष्ट पुरावे
या हाडांवरील चिरा आणि खुणा हाडे स्वच्छ करण्यासाठी होत्या की मांस खाण्यासाठी, यावर अनेक वर्षे चर्चा सुरू होती. आता पोलंडमधील मॅझिएचा (Maziecha) गुहेतील मानवाच्या हाडांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय चमूला नरभक्षणाचे ठोस पुरावे मिळाले आहेत.
आधीचा संभ्रम दूर झाला
यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, हाडांवर दातांचे ठसे नाहीत, त्यामुळे नरभक्षणाची शक्यता नाही. मात्र, नव्या अभ्यासात जुन्या डेटाचा बारकाईने अभ्यास करून नवीन पुरावे जोडण्यात आले. यात असं दिसून आलं की, त्या काळातील लोक मानवी मेंदू खात असत आणि विशेषतः पोषणयुक्त भाग खाण्याचा प्रयत्न करत असत.
अन्नासाठी संघर्ष आणि युद्धजन्य नरभक्षण
Scientific Reports मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, त्या काळातील लोकसंख्या वाढत होती, त्यामुळे अन्नासाठी स्पर्धा वाढली. यामुळे संघर्ष वाढला आणि शेवटी नरभक्षण युद्धाचा एक भाग बनला. लोक मृत झालेल्या व्यक्तींना खात होते किंवा ते आपल्या शत्रूंच्या शरीरावर ताव मारत होते. या नव्या संशोधनामुळे मानवाच्या इतिहासातील एक मोठं रहस्य उलगडलं आहे. १८ हजार वर्षांपूर्वीही अन्नासाठी माणूस इतका क्रूर होऊ शकत होता, हे अनेकांना धक्कादायक वाटत आहे.
हे ही वाचा : राग आला की माणसाचा चेहरा पिवळा-निळा का होत नाही, 'लाल'च का होतो? विज्ञानाने उलगडलं रहस्य...
हे ही वाचा : भल्यामोठ्या खोलीइतकं असतं 'या' प्राण्याचं हृदय, जेव्हा धडधडतं तेव्हा होतात भूकंप!
