भल्यामोठ्या खोलीइतकं असतं 'या' प्राण्याचं हृदय, जेव्हा धडधडतं तेव्हा होतात भूकंप!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
ब्लू व्हेल जगातील सर्वात मोठा प्राणी आहे. त्याचे हृदय लहान खोलीएवढे मोठे असते. त्याचे वजन 150 ते 200 टन असते आणि लांबी 30 मीटरपर्यंत असते.
तुम्ही कधी ऐकलंय का, एका अशा प्राण्याबद्दल ज्याचं हृदय धडधडतं आणि जिथे तो श्वास घेतो, तिथेच भोवतालचं सगळं हलू लागतं? हा प्राणी म्हणजे ब्लू व्हेल अर्थात निळा देवमासा! त्याचं हृदय एवढं मोठं असतं की ते एका छोट्या खोलीइतकं वाटतं, इतकंच नाही तर एका कारएवढं मोठंही असतं.
जगातील सर्वात मोठं हृदय!
ब्लू व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि जड जीव आहे. त्याच्या हृदयाचा आकार आणि वजन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काही शास्त्रज्ञांनी असंही सांगितलं आहे की निळ्या देवमाशाचं हृदय 'व्हॉल्क्सवॅगन बीटल' कारच्या आकाराचं असतं – सुमारे 14 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 5 फूट उंच!
व्हेलच्या हृदयाचा खरा आकार किती?
advertisement
शास्त्रज्ञांनी व्हेलच्या हृदयाचा मोजमाप करण्याचा प्रयत्न केला आणि कॅनडामधील रॉयल ऑन्टारियो म्युझियममध्ये तिचं एक हृदय आजही ठेवलेलं आहे. ते 5 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 5 फूट उंच आहे, आणि त्याचं वजन तब्बल 190 किलो! म्हणजेच 4-5 माणसं एकत्र उभी राहिल्यास, तेव्हढ्या जागेत हे हृदय मावेल.
इतर प्राण्यांच्या तुलनेत किती मोठं आहे व्हेलचं हृदय?
advertisement
साधारणतः एका व्हेलचं वजन 40,000 पाउंड (सुमारे 18 टन) असतं. त्यातील केवळ हृदयच 400 पाउंड (सुमारे 181 किलो) वजनाचं असतं, म्हणजेच एकूण शरीराच्या वजनाच्या 1 टक्के. पृथ्वीवरील सर्वात मोठा स्थलीय प्राणी आफ्रिकन हत्ती याच्या हृदयाचं वजन फक्त 13.6 किलो (30 पाउंड) असतं, तर निळ्या व्हेलच्या हृदयाचं वजन त्याच्या 14 पट जास्त असतं!
advertisement
मानवी हृदय किती वजनाचं असतं?
तुलनेसाठी, मानवी हृदयाचं वजन फक्त 283 ग्रॅम (10 औंस) असतं. म्हणजेच व्हेलच्या हृदयाचं वजन माणसाच्या हृदयाच्या तब्बल 640 पट अधिक असतं!
निळ्या व्हेलचा भव्य शरीररचना!
- वजन : 150 ते 200 टन
- लांबी : 30 मीटर (98 फूट) – म्हणजेच Boeing 737 विमानाएवढी!
- नवजात व्हेल : 2-3 टन वजन आणि 8 मीटर लांब असते.
- फुप्फुसे (lungs) : 5000 लिटर ऑक्सिजन साठवू शकतात.
- मेंदू : फक्त 6 किलो वजनाचा (तर मानवी मेंदू 1.4 किलोचा असतो).
advertisement
व्हेलच्या शरीराच्या अवाढव्य तुलना!
- शेपटी (Tail) लांबी : 7.6 मीटर – म्हणजेच एका डबल डेकर बसइतकी मोठी!
- एकूण वजन :
- 4 Boeing 737 विमाने
- 15 डबल डेकर बसेस
- 40 आफ्रिकन हत्ती
- 270 कार
- 3333 माणसं
व्हेलच्या हृदयाची धडधड म्हणजे समुद्रातला भूकंप!
निळ्या व्हेलच्या हृदयाची एक ठोकर समुद्रात लाटांचा मोठा झंझावात निर्माण करू शकते. तो जिथे पोहतो, तिथे भोवतालचं पाणी हादरतं. ब्लू व्हेल हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा जीव आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
भल्यामोठ्या खोलीइतकं असतं 'या' प्राण्याचं हृदय, जेव्हा धडधडतं तेव्हा होतात भूकंप!


