डॉक्टरने 5 वर्षे अंघोळच केली नाही, सांगितला फायदा, दुर्गंधी येत नसल्याचाही दावा
- Published by:Priya Lad
Last Updated:
दिवसातून किमान एकदा अंघोळ करावी, असा सल्ला दिला जातो. काही लोक दिवसातून दोनदा अंघोळ करतात. पण एक असा डॉक्टर ज्याने स्वतः 5 वर्षे अंघोळच केली नाही.
नवी दिल्ली : आपण दररोज अंघोळ करतो. दिवसातून किमान एकदा अंघोळ करावी, असा सल्ला दिला जातो. डॉक्टरही तेच सांगतात. काही लोक दिवसातून दोनदा अंघोळ करतात. पण एक असा डॉक्टर ज्याने स्वतः 5 वर्षे अंघोळच केली नाही आहे. आश्चर्य म्हणजे यानंतरही आपल्या शरीराला दुर्गंधी येत नाही असा दावा या डॉक्टरने केला आहे.
जेम्स हॅम्बलिन असं या डॉक्टरचं नाव आहे. दररोज अंघोळ करायला हवी का? दररोज अंघोळ केली नाही तर काय होईल? असे प्रश्न कित्येकांना पडतात. याचं उत्तर म्हणून डॉ. जेम्स यांनी प्रयोग करून पाहिला. त्यांनी अंघोळच करायची नाही असं ठरवलं. तब्बल 5 वर्षे त्यांनी अंघोळ केली नाही.
advertisement
चेसिंग लाइफ पॉडकास्टवर सीएनएनच्या डॉ. संजय गुप्ता यांच्याशी बोलताना डॉ. हॅम्बलिन यांनी सांगितलं, आपली त्वचा मायक्रोबायोमचं घर आहे. मायक्रोबायोम बॅक्टेरिया एक गुंतागुंतीचं तंत्र आहे जे त्वचेच्या आरोग्यात महत्त्वाची बूमिका बचावतात. साबण आणि शाम्पून वारंवार स्वच्छता केल्याने आपली त्वचा कोरडी होते, त्वचेतील तेल आणि रसायन निघून जातं.
अंघोळ केली नाही तरी दुर्गंधी येत नसल्याचा दावा
आता प्रश्न म्हणजे अंघोळ केली नाही तर शरीराला दुर्गंधी येणारच. मग ती कशी दूर करणार. हॅम्बलिन यांनी सांगितलं की, काळानुसार त्यांचं शरीरही यासाठी अनुकूल झालं. व्यायाम केल्यानंतर जेव्हा शरीर घाम, मिठाने भिजलेलं असेल तेव्हा फक्त पाण्याने धुता येतं.
advertisement
हॅम्बलिनचा उद्देश स्वच्छता नष्ट करण्याचा नाही तर वारंवार अंघोळ करायला हवी का, वैयक्तिक स्वच्छतेसाठी शॅम्पू, साबण यांची गरज आहे का, हे तपासणं होतं. 'लोकांना अंघोळ करूच नका', असं मी सांगत नाही असंही हॅम्बलिन यांनी स्पष्ट केलं आहे. याऐवजी स्वच्छतेप्रती जास्त सजग दृष्टिकोनाला ते प्रोत्साहित करत आहेत, असं ते म्हणाले.
advertisement
दिवसातून कितीदा अंघोळ करावी?
सामान्यपणे दिवसातून निदान एकदा आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. बहुतांश तज्ज्ञ, दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ न करण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते, दर दोन ते तीन दिवसांनी आंघोळ करणं, हे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे. कारण, वारंवार आंघोळ केल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल नाहीसं होतं आणि त्यामुळे त्वचा कोरडी होते व काहीवेळ खाजही सुटते.
advertisement
तुम्ही किती वेळा आंघोळ करावी हे तुमची जीवनशैली, तुम्ही ज्या वातावरणात राहता आणि तुमच्या वैद्यकीय स्थितीसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतं. जे लोक जास्त उष्ण परिसरात राहतात त्यांना एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ करावी लागू शकते. उष्णता असह्य असल्यास, तुम्ही दिवसातून तीनदा शॉवर घेऊ शकता. पण, त्यापेक्षा जास्त वेळा आंघोळ करू नये. नाहीतर त्वचेची आग होऊन आणि त्यावर सूज देखील येऊ शकते.
view commentsLocation :
Delhi
First Published :
February 10, 2025 12:32 PM IST


