मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिममध्ये हा प्रकार घडला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी अशोक कुलकर्णी(वय 76) आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुलकर्णी (वय 69) हे डोंबिवलीतील पश्चिमला वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने २ मतदार कार्ड पोस्टाने आल्याचं समोर आलं. आपल्या नावाने दोन वेगवेगळे मतदार कार्ड आल्याचं पाहून कुलकर्णी यांना धक्का बसला. विशेष म्हणजे, हे दोन्ही मतदार कार्ड एकाच दिवशी पोस्टाने घरी आले. या दोन्ही मतदार ओळखपत्रात नाव, पत्ता, वय आणि लिंग सारखेचं आहे. फक्त फोटो आणि कार्ड वेगळे होते. हा सगळा प्रकार पाहून कुलकर्णी यांनी स्थानिक लोकांना याची माहिती दिली.
advertisement
ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत यांनी कुलकर्णी यांची भेट घेतली आणि सगळा प्रकार समोर आणला. अशोक कुलकर्णी हे पोलीस दलात होते. २००७ मध्ये ते निवृत्त झाले होते. २ ते ३ महिन्यांपूर्वी घरी कार्ड आले होते. त्यानंतर आणखी दोन मतदान ओळखपत्र आले होते. हे दोन्ही ओळखपत्र कुलकर्णी यांच्या पत्नीचे होते. पण, या दोन्ही ओळखपत्रावर कुलकर्णी यांच्या पत्नीचा फोटो होता. तर दुसऱ्या मतदानर ओळखपत्रावर दुसऱ्या महिलेचा फोटो होता, मला एवढंच सांगायचं असा प्रकार थांबला पाहिजे, हे मतदारांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया निवृत्त पोलीस अधिकारी अशोक कुलकर्णी यांनी दिली.
तसंच, निवृत्त पोलीस अधिकारी सोबत असे होत असेल तर सामान्य नागरिकांना करायचं काय, असा सवाल ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत यांनी केला.
