घरातून निघाला तो परतलाच नाही!
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री जय हा आपल्या कारमधून राहटोली येथून बदलापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, रस्त्यावरून जात असताना अचानक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार भरधाव वेगात असल्याने ती थेट रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांनाही तातडीने माहिती देण्यात आली. पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र अपघातात जय गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
जयच्या मृत्यूने कुटुंब हादरले
या घटनेनंतर बदलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. जयच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. वेग आणि नियंत्रण सुटणे हे अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
