सकाळी 9 वाजता सुरू होणारा हा नाष्टा सेंटर फक्त दोन तास चालू असतो. या दोन तासात अनेकांची गर्दी इथे बघायला मिळते. कमी गुंतवणूकीत घरच्याघरी सुरू केलेला हा व्यवसाय ना शॉप ना हातगाडी स्वतःभर रस्त्याच्या बाजूला उभे राहून गेल्या 20वर्षांपासून विकत असतात. त्यात त्यांच्या माध्यमातून कल्याण शहरातील अनेक लोक सकाळी अंघोळ नाही पण नाश्ता संपेल म्हणून आवर्जून रांगा लावतात. त्यामुळे या ठिकाणी जून ग्राहकांची सख्या जास्तच बघायला मिळते. 5किलो पोहे, 3किलो उपमा आणि 5किलो इडली अस 13किलोच कोठा घेऊन हे दोघे नवरा बायको सकाळी लोकांचे नाश्ताची भूक भागवण्याचे काम करतात.
advertisement
सुरुवातीला मंजुळा यांना अनेक लोकांनी भर रस्त्यात उभे राहून विकत असत तेव्हा नावे ठेवली नको ते बोलले पण त्या लोकांकडे दुर्लक्ष करत त्यांनी आज स्वतःच अस्तित्व निर्माण केले आहे. एक महिला नवरा आणि कुटुंबांची साथ असेल तर कुठेही व्यवसाय करू शकते हे मंजुळा यांनी दाखवले आहे. आज त्यांच पूर्ण कुटुंब या व्यवसायावर उभे असताना त्या स्वतःयात मेहनत घेऊन ग्राहकांच्या प्लेट साफ करण्यापासून नाश्ता बनविण्यापर्यंत आज ही मंजुळा टोणपे काम करते. पूर्ण नाश्ता घरगुती पद्धतीत मिळत असल्याने जॉबला जाणारे येणारे लोक या ठिकाणी नाश्ता करून पुढचा प्रवास करत असल्याचे सुभाष टोणपे यांनी सांगितले.