नेमकं प्रकरण तरी काय?
उल्हासनगर कॅम्प-5 येथील व्यापारी कमल सुरेशलाल केशवाणी यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांची तब्बल 84 लाख 12 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुण बुलचंदाणी या व्यक्तीने अहमदाबादहून कमिशनवर कपडा आणून देण्याचे आमिष दाखवून सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले. पण प्रत्यक्षात त्याने कोणत्याही व्यापाऱ्याकडून ऑर्डर न घेता त्यांच्या जीएसटी नंबरचा गैरवापर केला.
advertisement
बुलचंदाणीने केशवाणी यांच्या अनिता टेक्स्टाइल, दीपक आहुजा यांचे परफेक्ट गारमेंट, प्रदीप आहुजा यांचे जीएम फॅब्रिक, सुरेशलाल केशवाणी यांचे आरती ट्रेडर्स, विजय आहुजा यांचे श्रीहरी टेक्स्टाइल, रमेश बलराजन यांचे नारायण फॅब्रिक या संस्थांचे जीएसटी नंबर वापरून अहमदाबादमधील पी.एस.के. डेनिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात कपड्यांचा माल मागवला.
हा कपड्यांचा साठा व्यापाऱ्यांच्या नावावर मागवला असला तरी बुलचंदाणीने तो स्वतःकडे ठेवून इतरांकडे विकला. पी.एस.के. डेनिममधूनच त्याने 47 लाख 14 हजार 507 रुपयांचा माल घेऊन विक्री केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण फसवणूक सप्टेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 या एका वर्षात करण्यात आली. या प्रकरणी बुलचंदाणीवर हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
