लोकलमध्ये प्रसूतीचा थरार
लोकल अंबरनाथ स्थानकात पोहोचल्यावर काही प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. ऑन-ड्युटी महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी परिस्थिती लगेच समजून लोकलमध्येच महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची तयारी केली. सर्व पुरुष प्रवाशांना उतरवण्यात आले आणि लोकलचे डब्बे बंद केले गेले.
अंबरनाथ लोकलमध्ये जन्मले गोंडस बाळ
लोकल डब्ब्यातच अंजू काळे हिला सुरक्षितपणे मुलगी जन्म दिली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांचे चेहरे आनंदाने भरले. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. अंजू काळे अंबरनाथमध्ये राहणारी असून काही कामानिमित्त कल्याणला गेली होती.
advertisement
महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या धाडस आणि वेळीच केलेल्या कृतीमुळे ही प्रसूती सुरक्षितपणे झाली. प्रवाशांनीही या घटनेला साथ दिली आणि बाळाच्या जन्माचा आनंद सगळ्यांमध्ये पसरला.
