बदलापुरात 'बीकेसी' येणार
या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या आणि सुसज्ज गृहसंकुलांची उभारणी केली जाणार आहे. यासोबतच नागरिकांसाठी माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा देणारी रुग्णालये, परवडणाऱ्या शुल्कातील चांगल्या शाळा, बाजारपेठा तसेच दैनंदिन गरजांसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी शहराबाहेर जावे लागणार नाही.
या संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अजय ठाणेकर यांनी सांगितले की बदलापूरमधील इतर बांधकाम व्यावसायिकांनीही पुढाकार घेतला तर शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. सर्वांनी विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून एकत्र काम केल्यास बदलापूरचा विकास मुंबईच्या धर्तीवर होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
पुढील पाच वर्षांत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईप्रमाणेच बदलापूर शहराचा अभिमान नागरिकांना वाटावा हाच या उपक्रमामागील प्रामाणिक उद्देश असल्याचे ठाणेकर यांनी सांगितले. या अभिनव संकल्पनेचे शहरात सर्वत्र स्वागत होत असून बदलापूरच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
