आसनगाव-कसारा प्रवाशांचा प्रवास आता वेगवान होणार
सध्या उपनगरी मार्गावरून लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि मालवाहतूक गाड्या एकाच मार्गिकेवरून धावत असल्याने वेळापत्रक कोलमडते आणि लोकल सेवा वारंवार खोळंबते. नव्या स्वतंत्र मार्गिकांमुळे मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचे योग्य नियोजन करता येणार असून लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
एमयूटीपी 3-अ अंतर्गत कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका उभारण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत – कल्याण ते आसनगाव आणि आसनगाव ते कसारा पूर्ण केला जाणार आहे. यातील कल्याण ते आसनगाव हा भाग मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत राबवला जात असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
लोकल प्रवाशांच्या सातत्याने होत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन लाखो मुंबईकरांनी कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत मार्गावर स्वतंत्र मार्गिकांची मागणी केली होती. त्यानुसार 30 डिसेंबर 2025 रोजी कल्याण ते कर्जत दरम्यान अतिरिक्त दोन मार्गिकांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
एमयूटीपी 3-ब अंतर्गत बदलापूर-कर्जत आणि आसनगाव-कसारा हे दोन्ही प्रकल्प सर्व मंजुरी मिळत असल्याने पुढे जात आहेत. याशिवाय पनवेल-वसई उपनगरी मार्गालाही लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
