काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुलगा मूळचा झारखंडचा होता. मुलाचे तिथल्याच परिसरातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण, तो फक्त 19 वर्षांचा होता, त्यामुळे कुटुंबाने लग्न करण्यासाठी कायदेशीररित्या 21 वर्षांचा होईपर्यंत वाट पाहा, असं सांगितलं. लग्नाला आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार असल्यामुळे मुलगा मानसिक तणावाखाली आला.
advertisement
कुटुंबाच्या या निर्णयामुळे मुलाला मानसिक आघात झाल्याचा दावा केला जात आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, यानंतर, मुलाने घराच्या छताला स्कार्फ लावून गळफास घेतला. कुटुंबाने मुलाला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या घटनेला अपघाती मृत्यू म्हणून घोषित करत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.
नेहा पवार प्रकरणाला धक्कादायक वळण
दुसरीकडे नाशिकमधील नेहा पवार प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. नाशिकमधील पंचवटीमध्ये काही दिवसांपूर्वी नेहा पवार या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं होतं. याआधी तिने ७ पानी चिठ्ठी लिहिली होती. या प्रकरणी आता पंचवटी पोलिसांनी हिरवाडी येथून एका मांत्रिकाला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. नेहाने टोकाचं पाऊल उचलण्यामागे अंधश्रद्धा हे सुद्धा एक कारण होतं, यातून ही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी येथील मयत नेहा पवार हिने आयुष्य संपवण्यामागे कौमार्य चाचणी आणि जादुटोण्याचं कारण असून त्याचा पोलिसांनी तपास करावा, असं महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपी संतोष पवार याच्या घराची झडती घेतांना जादुटोणाचे साहित्य मिळालं. नागाचा आकार असलेल्या खिळ्याला काळा बिबा आरपार केलेला आढळला. त्यासोबत गंडेदोरे आणि ताविज पण मिळाले. हे साहित्य कुठून आणले,अशी पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भोंदुबाबाचे नाव सांगितलं.
मयत नेहा पवार ही माहेरावरुन राखेसारखी भस्माची पुडी आणत होती. त्यामुळे घरात अडचणी येतात. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि नेहाला भिती घालण्यासाठी जादुटोणा केल्याचे आरोपी संतोष पवार आणि जिजाबाई पवार यांनी सांगितलं. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी नाशिकच्या हिरावाडी येथून सुनिल बबन मुंजे (वय 42 वर्ष )या मांत्रिकाला सोमवारी रात्री अटक केली.
